सभेमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर रविवारी पार पडला. राज्यभरातून कार्यकर्ते येथे आले होते. यात काही जण रेल्वेने तर काही जण खासगी वाहनाने आले होते. यामुळे पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच नवी मुंबईला जाण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वार्षिक मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेबाबत सूचना जारी केल्या होत्या. पाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी राज्यभर मनसेचे अनेक समर्थक आणि कार्यकर्ते त्यांच्या वाहनांसह दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आले होते. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने आली होती. कार्यक्रमस्थळाकडे जाताना आणि कार्यक्रम संपल्यावर दादर आणि जवळच्या भागात वाहतूक कोंडी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.