मुंबई

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक

CD

एसटी महामंडळाच्या
अध्यक्षपदी प्रताप सरनाईक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना बुधवारी परिवहन विभागाने काढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी महामंडळाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केली होती.
राज्याच्या परिवहन खात्याची ज्या मंत्र्यांवर जबाबदारी असते त्यांच्याकडेच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्याची परंपरा आहे. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना २०१४ ते २०१९ या कालावधीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ ते २०२२ या काळात अनिल परब यांच्यावर परिवहन खात्यासह एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना परिवहन आणि एसटी महामंडळाची जबाबदारी त्यांनी स्वतःकडेच ठेवली होती. ही परंपरा फडणवीस यांनी मोडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT