मुंबई

तहव्‍वूर राणा घटनाक्रम

CD

घटनाक्रम

- नोव्हेंबर २००८ : २६/११ हल्ल्याच्या दोन आठवडे आधी तहव्‍वूर राणा अमेरिकेहून मुंबईत आला होता. मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये त्याने काही दिवस वास्तव्य केले होते. साथीदार डेव्हिड हेडलीला हल्ल्यासाठी मुंबईतील संभाव्य ठिकाणे निवडता यावीत, यासाठी राणाने त्याला सर्वतोपरी सहकार्य केले, असा आरोप आहे. हल्ल्यापूर्वी वास्तव्यातही त्याने हेडलीला मदत केली होती.
- ऑक्टोबर २००९ : जीललँड पोस्टन वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने राणा आणि हेडलीला अटक केली.
- नोव्हेंबर २००९ : ‘एनआयए’ने राणा आणि हेडलीविरोधात दिल्ली येथे गुन्हा नोंदवला.
- मे २०१० : अमेरिकेतील डिस्ट्रिक्ट कोर्टात राणाविरोधात खटला सुरू झाला.
- जानेवारी २०११ : अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने राणाला दहशतवादी संघटनांना सहकार्य केल्याच्या आरोपात दोषी ठरवले. मुंबई हल्ल्यात थेट सहभागाचा आरोप पुराव्याअभावी फेटाळला.
- डिसेंबर २०११ : ‘एनआयए’ने तपास पूर्ण करून राणाविरोधात दिल्लीतील पटियाला हाऊसप्रकरणी विशेष आरोपपत्र दाखल केले. त्याचबरोबर राणाच्या प्रत्यार्पणाची विनंती अमेरिकेकडे करण्यात आली.
- जानेवारी २०२५ : प्रत्यार्पणाविरोधात राणाने केलेली याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
- फेब्रुवारी २०२५ : राणाच्या प्रत्यार्पणाला प्रशासकीय मान्यता दिल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात तातडीचा अर्ज करून प्रत्यार्पणाबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंती केली.
- एप्रिल २०२५ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची प्रत्यार्पण रोखण्याची ही अंतिम संधी फेटाळून आली. परिणामी त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार १० एप्रिलला त्याला भारतात आणण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठ किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महामोर्चा

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT