मुंबई

विकसित कामाठीपुराला नामदेव ढसाळ यांचे नाव देऊ

CD

विकसित कामाठीपुराला नामदेव ढसाळ यांचे नाव देऊ
सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांची ग्वाही


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : ‘महाकवी नामदेव ढसाळ यांनी ज्या कामाठीपुरातील व्यथा-वेदना मांडल्या, त्या कामाठीपुराचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. विकासानंतर या भागाला महाकवी नामदेव ढसाळनगर असे नाव देण्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी येथे दिली. नामदेव ढसाळ यांच्या ७६ व्या जयंत्तीनिमित्ताने भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात ‘सारे काही समष्टीसाठी’ या महोत्सवाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ११) आशीष शेलार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

‘ज्यांनी समष्टीचा मूळ विचार मांडला, त्या नामदेव ढसाळ यांच्या आणि माझ्या जगण्यात काही साम्यस्थळे आहेत. त्यामुळे मी नामदेव ढसाळ यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे.’ असे सांगत सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी गिरणगावातील आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘गिरणगावातील माझ्या बालपणाच्या आठवणींसोबत नामदेव ढसाळ यांची लेखणी जोडलेली आहे. शिक्षणाच्या प्रमाणपत्रांपेक्षा अनुभवाची आणि वेदनेची विद्यापीठे त्यांच्याकडे होती. त्यांचे लेखन म्हणजे ज्वालामुखीतून बाहेर पडणारी अस्सल शक्ती होती. त्यांचे लिखाण हे रेषा, व्याकरण आणि परंपरागत चौकटी मोडणारे होते. ढसाळ यांनी मराठी साहित्यात नवीन प्रमेय मांडले; त्यामुळे ढसाळ मराठी साहित्यातील ‘पायथागोरस’ होते. नामदेव ढसाळ यांचे संपूर्ण आयुष्य ही समष्टीची लढाई होती. कुठलीही तडजोड न करता, निर्भयपणे विचार मांडणारे ते व्यक्तिमत्त्व होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘व्यक्ती ते समष्टी, व्यक्ती ते प्रकृती’ या अंत्योदयाच्या विचाराशीही हे तत्त्व एकरूप आहे.’ असेही शेलार यांनी नमूद केले.


..
कवी नामदेव ढसाळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार समाजात रुजविण्याचे करीत होते. नामदेव ढसाळ यांनी आपले आयुष्य आणि साहित्य हे सामान्य माणसाला न्याय आणि समानता मिळवून देण्यासाठी खर्ची घातले.
- उदय सामंत, उद्योग व मराठी भाषा मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT