दुबई चेंबर्सची उच्चस्तरीय बैठक संपन्न
भारत व संयुक्त अरब अमिरातीमधील आर्थिक संबंध दृढ होणार
मुंबई, ता. ११ : दुबईचे युवराज व उपपंतप्रधान शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या उपस्थितीत दुबई चेंबर्सतर्फे मुंबईत शुक्रवारी एक उच्चस्तरीय व्यावसायिक बैठक आयोजित करण्यात आली. भारत व संयुक्त अरब अमिरातीतील व्यापार व गुंतवणुकीच्या संधी वाढवणे, हा त्यामागील हेतू आहे.
संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मारी आणि भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांची ताकद अधोरेखित केली. दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय व्यापारात लक्षणीय वाढ घडवणाऱ्या भागीदारीला बळकट करण्याची हमी दिली.
भारतासारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांशी भागीदारी बळकट करून, आम्ही केवळ आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केंद्र म्हणून दुबईची भूमिका बळकट करत नाही, तर अमिरातीच्या व्यवसायांसाठी नवीन जागतिक संधी शोधण्यासाठी मार्गही तयार करत आहोत, असे दुबई इंटरनॅशनल चेंबरचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलेयम म्हणाले.
भारतीय कंपन्यांची लाक्षणिक गुंतवणूक
मुंबई आणि बंगळूर कार्यालये दुबई आणि भारत यांच्यातील गुंतवणुकीच्या प्रवाहाला गती देतील, असे अल मन्सुरी यांनी नमूद केले. दुबईमार्फत भारतात वाहतूक आणि गोदामे, स्थावर मालमत्ता आणि माहिती तंत्रज्ञान सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे, तर भारतीय कंपन्यांनी दुबईच्या सॉफ्टवेअर आणि आयटी सेवा, व्यवसाय सेवा आणि ग्राहक वस्तू क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक केल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.