प्रवासी बोट समुद्रात अडकली
१३० प्रवाशांचा थरार; सर्वांची सुखरूप सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा जेट्टीच्या दिशेने निघालेली अजंठा कंपनीची प्रवासी बोट समुद्रात लाटांमध्ये अडकल्याची थरारक घटना शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी घडली. या फायबरच्या बोटीत अचानक पाणी शिरल्याने प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले; मात्र वेळेवर मदत पोहोचल्याने बोटीत असलेले सर्व १३० प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
गेटवे ऑफ इंडिया येथून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही बोट मांडवा जेटीकडे रवाना झाली होती. प्रवास सुरळीत सुरू असताना मांडवा जेट्टीपासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर समुद्रात जोरदार वारे व उंच लाटा यांचा सामना या बोटीला करावा लागला. लाटांच्या तीव्र तडाख्यामुळे बोटीच्या तळाशी भगदाड पडल्याने तिच्यात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरू लागले. प्रवाशांनी आणि बोटीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मांडवा जेट्टीवरील प्रशासनाशी संपर्क साधला. माहिती मिळताच मदतकार्यासाठी काही स्पीड बोट्स घटनास्थळी पाठवण्यात आल्या. या मदतीमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या मांडवा जेट्टीवर पोहोचवण्यात आले. दरम्यान, अडचणीत सापडलेली बोटही किनाऱ्यावर आणण्यात आली, या घटनेमुळे समुद्रामार्गे प्रवास करणाऱ्या बोटींमधील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.