मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या प्रवेशपूर्व नोंदणीला मुदतवाढ

CD

मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या प्रवेशपूर्व नोंदणीला मुदतवाढ
२६ मेपर्यंत करता येणार ऑनलाइन नावनोंदणी, २७ तारखेला पहिली गुणवत्ता यादी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील पदवीच्या तीन आणि चारवर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे आता विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे. तीनवर्षीय पदवी अभ्यासक्रम, चारवर्षीय ऑनर्स/ऑनर्स विथ रिसर्च, पाचवर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टिपल एन्ट्री अँड मल्टिपल एक्झिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत बीए, बीएस्सी, बीकॉम, बीए एमएमसी, बीएसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन, न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (जर्मन अभ्यासातील एकात्मिक अभ्यासक्रम), बीए-एमए (पाली भाषेतील एकात्मिक अभ्यासक्रम) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (आर्थिक बाजार), बीकॉम (लेखा आणि वित्त), बीकॉम (बँकिंग आणि विमा), बीकॉम (आर्थिक व्यवस्थापन), बीकॉम (गुंतवणूक व्यवस्थापन), बीकॉम (सार्वजनिक बंदर व्यवस्थापन), बीकॉम (व्यवस्थापन अभ्यास), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणक विज्ञान), बीएस्सी (आदरातिथ्य अभ्यास), बीएस्सी (सूक्ष्मजीवशास्त्र) अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.

आतापर्यंत पाच लाख नऊ हजार ५७८ अर्ज
बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून, आतापर्यंत दोन लाख २५ हजार ५५६ एवढी नोंदणी झाली असून, एक लाख ४५ हजार ८७ एवढ्या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी पाच लाख नऊ हजार ५७८ एवढे अर्ज सादर केले आहेत.

प्रवेशपूर्व नोंदणीचे सुधारित वेळापत्रक :
- अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाइन/ऑफलाइन) २६ मे, (दुपारी १ वाजेपर्यंत)
- प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) २६ मे (दुपारी १ वाजेपर्यंत)
- ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे २६ मे, (१ वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाउस ॲडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
- पहिली मेरिट लिस्ट -२७ मे, (संध्याकाळी ५ वाजता)
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) - २८ मे ते ३० मे, (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- द्वितीय मेरिट लिस्ट - ३१ मे, (संध्याकाळी ७ वाजता)
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - २ जून ते ४ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- तृतीय मेरिट लिस्ट - ५ जून, २०२५ (संध्याकाळी ७ वाजता)
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - ६ जून ते १० जून, २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ओरिएंटेशन - १३ जून २०२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT