मुंबई

श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या जयंती महोत्सवाला अमित शाह यांची उपस्थिती अमित शाह यांची उपस्थिती

CD

श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या जयंती महोत्सवाला अमित शाह यांची उपस्थिती

मुंबई, ता. २४ : माधवबाग संकुलातील श्री लक्ष्मी नारायण मंदिराला १५० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती राहील. जयंती उत्सवाचे आयोजन २७ मे रोजी करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील उपस्थित राहतील. मंदिराच्या शतकोत्तर परंपरेचा गौरव करणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमदेखील या वेळी आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणासाठी संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा संध्या पुरेचा, सरफोजीराजे भोसले संस्था यांना आमंत्रित करण्यात आले आहे. श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे मुंबईच्या सामाजिक व आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. माधवबाग संकुलाचा इतिहास तब्बल १५० वर्षांपूर्वीचा असून, जेव्हा हा परिसर ‘लालबाग’ म्हणून ओळखला जात असे तेव्हा इ. स. १८७४ मध्ये कपोल समाजातील दोन मान्यवर उद्योजक वर्जिवंदास माधवदास आणि नरोत्तम माधवदास यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ १८७५मध्ये श्री लक्ष्मी नारायण मंदिराची स्थापना केली. या मंदिराचे बांधकाम प्रसिद्ध वास्तुविशारद श्री भीमा रामजी यांच्या देखरेखीखाली पोरबंदरच्या दगडांत करण्यात आले. पारंपरिक स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर आजही मुंबईतील एक प्रमुख श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफी

SCROLL FOR NEXT