कालसुसंत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षणातून शिक्षक गतिमान व्हावेत ः मनिषा पवार
मुंबई, ता. २८ : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांच्यावतीने आयोजित वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणात संस्थेच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. घाटकोपर येथील एसपीआर कन्याशाळा येथे चार दिवस चालणाऱ्या जिल्हास्तरीय सुलभकांच्या प्रशिक्षण उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रशिक्षण समन्वयक वैशाली काकडे, विद्या प्राधिकरणचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांच्यावतीने राज्यस्तरावर वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण घेतलेल्या वरिष्ठ अधिव्याख्याता संगीता राठोड, तज्ज्ञ मार्गदर्शक जयवंत कुलकर्णी, चंद्रकांत मुंढे, सायली कदम, मच्छिंद्र बोऱ्हाडे, कला क्रीडा विभागातून दीप्ती बारवाल, साक्षी कामतेकर, नीता जाधव आणि स्वाती सुर्वे यांची निवड करण्यात आली होती. हे मार्गदर्शक प्रथमतः २६ ते २९ मेदरम्यान मुंबईतील विभागवार सुलभकांना प्रशिक्षण देतील. त्यानंत २ ते १२ जूनदरम्यान होणाऱ्या प्रशिक्षणात राज्यस्तरीय सुलभक पर्यवेक्षण करतील, असे मनीषा पवार म्हणाल्या. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत स्कॉफ, समग्र प्रगती पुस्तिका, क्षमता व अध्ययन निष्पत्ती आधारित अध्यापन, राज्य अभ्यासक्रम आराखडा, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर, एआयचा कौशल्यपूर्ण वापर, एकविसाव्या शतकातील विविध कौशल्ये यासारख्या महत्त्वाच्या संकल्पना शिक्षकांनी अवगत केल्या पाहिजेत. असे केले तरच राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अपेक्षांची प्रतिपूर्ती होईल, असे प्राचार्य मनीषा पवार म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.