मुंबई

पदवीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत कटऑफमध्ये किंचित घट

CD

पदवीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत कटऑफमध्ये किंचित घट
एआय, डेटा सायन्ससह वाणिज्य शाखेकडे कल कायम
मुंबई, ता. ३१ : मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या ९०४ वरिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञानसह इतर विविध प्रकारच्या पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी शनिवारी (ता. ३१) जाहीर झाली. यात मुंबई, ठाणे‍ जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)सोबतच डेटा सायन्स आदी नवीन अभ्यासक्रमांची कट ऑफ पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत दोन ते चार टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठीचा कल या गुणवत्ता यादीतही कायम आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीत रुईया महाविद्यालयात बायोटेकची कटऑफ ९४ टक्क्यावर जाऊन पोहोचली होती, ती या वेळी ८८.६ टक्के झाली तर पोद्दार महाविद्यालयात बीएफएमची कटऑफ ९४.५० टक्केवरून ९३.२ टक्क्यांवर आली. सेंट झेवियर्समध्ये कला, बीए सायकॉलॉजी अँड इंग्लिश शाखेची कटऑफ एक ते दीड टक्यांनी कमी झाली असून डेटा सायन्स आणि एआयकडे या वेळी विद्यार्थ्यांचा कल अधिक राहिल्याचे दिसून आले आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २ ते ४ जून या कालावधीत संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर पदवीच्या रिक्त राहिलेल्या जागांवरील प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी ५ जून रोजी सायंकाळी सात वाजता जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT