‘शिक्षक समायोजनाचे धोरणच रद्द करा’
मुंबई, ता. १ : राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्येच्या कारणावरून शाळांचे समायोजन करत मराठी माध्यमाच्या सुमारे १४ हजार शाळा बंद करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून घातला होता, त्यातून १८ हजार शिक्षक यामुळे अतिरिक्त होणार असल्याने अतिरिक्त समायोजनाच्या धोरणाला सध्या जी तात्पुरती स्थगिती देण्यात आली, ती न देता यासाठी असलेले धोरणच रद्द करण्याची मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे. शिक्षकांच्या समायोजनाच्या विरोधात जी याचिका करून उच्च न्यायालयात दाद मागितली; त्या पार्श्वभूमीवर ही स्थगिती देण्यात आली असली तरी त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी यासंदर्भातील असलेले धोरण रद्द करून राज्यातील मराठी शाळांचे हित जपता येऊ शकते, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले. तसेच या पार्श्वभूमीवर शासनाने पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद न करण्याचा शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.