महिला आयोगाच्या अडचणींवर विशेष बैठक
मुंबई : महिला आयोगासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ३) एक महत्त्वाची बैठक विधान भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. वैशाली हगवणे हुंडाबळी प्रकरणात महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर तसेच अडचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रमाणीकरण प्रक्रिया, अंतर्गत अडचणी, अंमलबजावणीची स्थिती, तसेच आयोगाकडून असलेल्या अपेक्षांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा यावर सविस्तर विचारमंथन होणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर दुपारी १२ वाजता महिला हक्कांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. या संवादातून सामाजिक कार्यकर्त्यांचे अनुभव, अपेक्षा आणि सूचना समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असून, आयोगाच्या कामाबाबत संवाद घडवण्याचा हेतू आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.