मुंबई

भरधाव वेगामुळे दोघांचा मृत्यू

CD

भरधाव वेगामुळे दोघांचा मृत्यू
गोवंडी आणि चेंबूर येथील घटना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : भरधाव वाहनाच्या धडकेत गोवंडी आणि चेंबूर येथील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेला विकास रामराज यादव (वय २४) हा कुटुंबीयांसोबत खारदांडा परिसरात राहत होता. त्यांच्या कुटुंबीयांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. विकास व त्याचे वडील शनिवारी (ता. ३१) रिक्षाने वाशी येथून भाजीपाला खरेदी करून परत येत असताना मानखुर्द परिसरात त्याच्या रिक्षाच्या पुढे चाललेल्या टोईंग व्हॅनने अचानक ब्रेक दाबला. यामध्ये विकास चालवत असलेल्या रिक्षाची टोईंग व्हॅनला जोराची धडक बसली. या टोईंग व्हॅनचा लोखंडी हूक विकासच्या डोक्याला लागून तो गंभीर जखमी झाला. रामराज यांनी त्याला तातडीने उपचारांसाठी शताब्दी रुग्णालयात नेले; पण तेथे उपचारांदरम्यान विकासचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवनार पोलिसांनी टोईंग व्हॅनचालकाविरोधात गुन्हा नोंदवला. दुसऱ्या घटनेत, विलेपार्ले परिसरात राहणारा सुभाष डुलगच हा एका हाउस किपिंग कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरी करीत होता. शनिवारी (ता. ३१) दुपारी पावणेएकच्या सुमारास सुभाष हा कंपनीच्या कामानिमित्त घाटकोपर-मानखुर्द लिंकवरून दुचाकीने जात असताना भरधाव डम्परने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या सुभाषला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर डम्परचालक गोविंदा चव्हाण (३५)विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

Commonwealth Games 2026: किराणा दुकान चालवणाऱ्या बापाच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! बिंद्यारानी देवीने भारताला जिंकून दिले सहावे पदक

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Update: आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT