मुंबई

राज्यात ५९ तर मुंबई २० नवीन कोविड रुग्ण नोंद

CD

राज्यात ५९ तर मुंबईत २० नवीन कोविड रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : राज्यात ५९ तर मुंबईत २० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ नोंदवली जात असली तरी सध्या केसेस तुरळक असून, लक्षणे सौम्य स्वरूपाची असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले आहे. नोंदीनुसार राज्यात सद्यःस्थितीत ४९४ सक्रिय रुग्ण आहेत. यातील सर्वाधिक २० रुग्ण मुंबईत, तर पुणे मनपात १७ रुग्णांची नोंद आहे. अन्य ठिकाणांमध्ये ठाणे, सातारा, कोल्हापूर, अकोला व छत्रपती संभाजीनगर आदींचा समावेश आहे. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत राज्यात एकूण १२,०११ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी ८७३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये सहव्याधीग्रस्त व्यक्तींची संख्या जास्त आहे. यामध्ये नेफ्रोहेटिक सिंड्रोम, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक, एआरडीएस आणि फुप्फुसाचे आजार असलेले रुग्ण होते. बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांसह असून, योग्य उपचार दिले जात आहेत. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ३६९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे कुणीही घाबरू नये. राज्यात कोविडची तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : देवदेवतांच्या नावावर आम्हाला त्रास, सणासुदीत हिंदूंचीच अडवणूक का? मुंबईला निघण्याआधी जरांगेंचा मोदी-शहांना सवाल

Pune Ganpati 2025 : महापालिकेचे यंदाही पर्यावरणपूरक उपक्रम; मूर्तिदान संकल्पना, खतनिर्मिती अन् शाडूमातीच्या पुनर्वापरावर भर

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाट

Latest Maharashtra News Updates : चिंचपोकळीच्या गणपतीची विधिवत पूजा

Weightlifting: वेटलिफ्टिंगमध्ये यश खंडागळेला सुवर्ण; राष्ट्रकुल चॅम्पियनशिप,६५ किलो वजनी गटात विक्रम

SCROLL FOR NEXT