मुंबई

कर्नाक उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण

CD

कर्नाक उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण
रंगकाम, मार्गरेषा आखणी कामे येत्या चार दिवसांत पूर्ण होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मशीद बंदर रेल्वेस्थानक आणि पी. डि''मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्गरेषा आखणी, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक उभारणीची कामे प्रगतिपथावर असून, ती येत्या चार दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत. यानंतर पूल वाहतुकीसाठी सज्‍ज होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी आज (ता. १०) कर्नाक पुलाच्या कामांची पाहणी करून आढावा घेतला.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. १२५ वर्षे जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्‍याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने ऑगस्‍ट २०२२मध्‍ये पुलाचे निष्‍कासन केले. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. मध्‍य रेल्‍वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्‍यात आले आहे. सद्य:स्थितीत आरसीसी डेक स्लॅब, डांबरीकरण, महापालिकेच्या ह‌द्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.
या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून, रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी आहे. महापालिका ह‌द्दीतील पोहोच रस्‍त्‍याची एकूण लांबी २३० मीटर असून, पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर इतकी आहे. लोहमार्गावरील पुलाच्‍या उभारणीकामी आरसीसी आधारस्तंभ यावर प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब, २६.५० मीटर रुंद आणि १०.८ मीटर उंचीच्‍या दोन तुळया स्‍थापित करण्‍यात आल्‍या आहेत.
या प्रकल्पांतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण आणि उत्तर बाजूची लोखंडी तुळईचे काम यशस्‍वीरीत्‍या पूर्ण करण्‍यात आले आहे. पूर्वेकडील संपूर्ण कामे म्‍हणजेच पायाभरणीपासून ते डांबरीकरणापर्यंतची कार्यवाही अवघ्या चार महिन्यांत पूर्ण करण्यात आली आहे. ही कामे कमी वेळेत पूर्ण करणे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक, कौशल्याचे व जोखमीचे होते. या प्रकल्पाचे पर्यवेक्षण सल्लागार मेसर्स राइट्स लिमिटेड यांनी पुलासाठी संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र दिले आहे. कर्नाक पुलाच्‍या कामाचे उद्दिष्‍ट गाठण्‍यात पूल विभागाला यश आले आहे. त्‍यानुसार पावसाळ्यापूर्वी पूर्व-पश्चिम मुख्‍य वाहतूक मार्ग नागरिकांच्‍या सेवेत दाखल झाला आहे. पदपथाचे काम पूर्ण झाले असले तरी पश्चिम दिशेकडील रस्‍त्‍याचे काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे. त्‍यामुळे जिन्‍याचे काम पावसाळ्यानंतर केले जाईल. त्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे अभिजित बांगर यांनी स्‍पष्‍ट केले.
पूर्व आणि पश्चिमेकडील आरसीसी डेक स्लॅबचे कामदेखील पूर्ण झाले आहे. मार्गिकेवरील काँक्रीट, मास्टिक, ध्वनिरोधक अशी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वे हद्दीत अपघातरोधक अडथळा बसवण्यात आले आहेत. एकूणच पुलाचे मुख्‍य बांधकाम पूर्ण झाले असून, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, पथदिवे, थर्मोप्लास्ट, कॅट आईज अशी उर्वरित कामे कामे १४ जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जातील. पुलाची भारक्षमता, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी १३ जून २०२५ रोजी भार चाचणी घेण्यात येणार आहे.

कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे -
- मुंबई शहराच्या दक्षिणेतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा
- पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुरक्षित व वाढीव सुविधा उपलब्ध होणार
- पूर्व मुक्त मार्गावरून येणारी वाहतूक तसेच पी. डि''मेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
- पी. डि''मेलो मार्गावरून गिरगाव, चर्चगेट, मंत्रालय, काळबादेवी, धोबी तलाव परिसरात वाहतूक सुविधा
- युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT