कामगार रुग्णालयात आंतररुग्ण सुविधा सुरू करा ः आबिटकर
मुंबई, ता. ११ : अंधेरी पूर्वेतील औद्योगिक वसाहतीमधील कामगार रुग्णालयातील आंतररुग्ण सुविधा सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
कामगार रुग्णालयाच्या संबंधित प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच नगरविकास, उद्योग, कामगार व आरोग्य विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या रुग्णालयास २०१८ मध्ये आग लागली होती. त्यानंतर रुग्णालयातील आरोग्यसेवा बंद करण्यात आल्या होत्या. या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या रुग्णालयात केवळ बाह्यरुग्ण सुविधा दिली जाते. त्यामुळे कामगार व स्थानिक रुग्णांची गैरसोय होत आहे. पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू करण्याची स्थानिकांची मागणी होती. त्यानुसार मंगळवारी आरोग्यमंत्र्यांनी स्थानिक आमदार मुरजी पटेल यांच्यासह कामगार रुग्णालयाला भेट दिली. या वेळी मंत्र्यांनी रुग्णालयाच्या बांधकामाची, विविध विभागांची पाहणी केली. २-डी इको सुविधा कक्षाचे या वेळी उद्घाटन करण्यात आले. या वेळी आयोजित बैठकीत मंत्री महोदयांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालय सुरू होण्यास विलंब झाला असून, याप्रश्नी जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.