मुंबई

अकरावी प्रवेशाचा बोजवारा सुरूच

CD

अकरावी प्रवेशाचा बोजवारा सुरूच
शून्य फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार विलंब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत महिनाभरापासून सुरू असलेला गोंधळ अद्याप सुरूच आहे. विविध कोट्याच्या प्रवेशाची शून्यफेरीची गुणवत्ता यादी बुधवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर होणार होती; परंतु रात्री उशिरापर्यंत यादी शिक्षण संचालनालयाला जाहीर करता आली नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा पुन्हा एकदा बोजवारा उडाला आहे.
अकरावीच्या अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाऊस कोट्यातील प्रवेशासाठी शून्य फेरी आणि तिची गुणवत्ता यादी ही कॅप राऊंडच्या गुणवत्ता यादीपूर्वी जाहीर केली जाते; मात्र प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ आणि यंत्रणेतील त्रुटींमुळे रात्री उशिरापर्यंत यादी शिक्षण संचालनालयाला जाहीर करता आली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना या अनागोंदी कारभाराचा फटका बसला. शून्य फेरीची गुणवत्ता यादी रखडल्याने या फेरीत प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा कॅप राऊंडच्या प्रवेशासाठी मोठा गोंधळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रात्री उशिरा ही यादी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये जाहीर करण्यात आली, तर गुरुवारपासून ती महाविद्यालयांना दिसणार असल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT