मुंबई

पावसाळी आजारांचा विळखा

CD

पावसाळी आजारांचा विळखा
मुंबईसह राज्यात रुग्ण वाढले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : पावसाळा सुरू होताच विविध आजार पसरू लागले आहेत. पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, १ ते १४ जूनदरम्यान मुंबईत मलेरियाचे सर्वाधिक ३१४ रुग्ण आढळले आहेत. यात डेंगी ४८, चिकनगुनिया ४ आणि लेप्टोस्पायरोसिस १६ अशा रुग्णांचा समावेश आहे. २०२४च्या तुलनेत २०२५ मेमध्ये लेप्टोस्पायरोसिस वळगता इतर कीटकजन्य व जलजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत अंशतः वाढ झालेली दिसून येते.‬
पालिका आरोग्य विभागाने स्वतः कबूल केले आहे, की डासांमुळे होणाऱ्या आजारांनी बाधित झालेल्या लोकांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांनी आपल्या घराभोवती पाणी साचू देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. कारण डेंगी, मलेरिया आणि चिकनगुनियाचे डास स्वच्छ पाण्यात प्रजनन करतात. यासोबतच या आजारांची लक्षणे दिसल्यास पालिका दवाखाना किंवा रुग्णालयातील डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घेण्याचे सल्ला आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राज्यात १४ जूनअखेरपर्यंत ४,४७१ मलेरिया, २,०३१ डेंगी आणि चिकनगुनियाचे ९०० रुग्ण आढळले आहेत. तसेच तीन मेंदूज्वर आजाराचे रुग्ण सापडले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी, जलद ताप सर्वेक्षण, रुग्णांचे रक्त नमुने घेणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत.
डेंगी,  मलेरियासारख्या रोगांना आळा बसावा आणि त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी मुंबई पालिकेच्या कीटकनाशक खात्याकडून नियमितपणे करण्यात येत असते.


उपाययोजना
सध्या अधूनमधून पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनी आपल्या घरांमध्ये, घराच्या आजूबाजूला आणि इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचलेले असणार नाही याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच ‬डासांची मादी अंडी घालते आणि डासांची उत्पत्तीस्थळे तयार होतात, ही बाब लक्षात घेता साचलेले पाणी आढळून‬ आल्यास तत्काळ निचरा करावा आणि खास दक्षता घ्यावी. जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लॅस्टिक कंटेनर यासारखा वस्तू जमा करणे टाळावे, असे आवाहन आरोग्‍य विभागाने केले आहे.

अशी घ्या काळजी
-  रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे.
- हात धुवावेत, लक्षणे असल्यास गर्दीत जाऊ नये.
- शिंकताना, खोकताना नाक-तोंडावर रुमाल धरावा, मास्क वापरावा.
- घर, परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.



...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: अनंत अंबानींच्या साखरपुड्यात कुत्र्याने आणून दिली होती रिंग... राजू शेट्टींचा PETA India ला खोचक सवाल?

Latest Marathi News Updates Live : उद्धव ठाकरेंकडे एवढा पैसा कुठून येतो? - नारायण राणे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींची चिंता वाढली! योजनेत फेरपडताळणीची तयारी; ६०० महिलांचा लाभ नाकारण्याचा निर्णय

21 हजारचा मोबाईल मिळतोय 11 हजारात; Motorola G85 स्मार्टफोनवर 50% डिस्काउंट, ऑफर पाहा एका क्लिकवर

Shivaji Patil Statement : चंदगडच्या आजी -माजी आमदारांमध्ये जुंपली,कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता; शिवाजी पाटील असे का म्हणाले...

SCROLL FOR NEXT