मुंबई विद्यापीठ १७व्या स्थानी
सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, (ता. १९) : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली आहे. नुकत्याच झालेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग २०२६मध्ये मुंबई विद्यापीठाने भारतातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत १७व्या क्रमांकावर झेप घेऊन राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत द्वितीय स्थान पटकावले आहे. क्वाकरेली सायमंड (क्यूएस) यांनी जगासह देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची यादी जाहीर केली असून, या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत विद्यापीठाने वर्ल्ड रँकिंगमध्ये सुधारणा करून ७११-७२०च्या क्रमवारीमधून यावर्षी ६६४वे स्थान निश्चित करीत उत्तुंग झेप घेतली आहे.
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत एम्प्लॉयमेंट आऊटकममध्ये सर्वाधिक ९५ गुण प्राप्त केले आहेत. सायटेशन पर फॅकल्टी वर्गवारीत ५३.७, सस्टेनॅबिलिटी ४१.३, एम्प्लॉयर रेप्युटेशन ३१.५, इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क २७.६, अकॅडेमिक रेप्युटेशन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रमाण आणि फॅकल्टी स्टूडेंट्स रेशो यामध्येही विद्यापीठाने उत्तम कामगिरी केली आहे.
मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करीत विविध व्यावसायिक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यापीठाच्या १२ विभागांना राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता मिळाली असून, विद्यापीठाशी सलंग्नित असलेले ८० हून अधिक प्राध्यापक हे व्यावसायिक कार्यकारणींवर कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांत १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी ह्या प्राध्यापकांना गौरविण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि शाश्वत प्रयत्नांची ही फलनिष्पती आहे. या निकालाचे समाधान असून रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने यूडीआरएफसारखे अभिनव प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण, शाश्वत विकास आणि प्राध्यापक भरती यामुळे भविष्यात रँकिंगमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.