मुंबई

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा!

CD

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा!
दोन्ही ठाकरेंनी मेळाव्यासाठी कसली कंबर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : हिंदीसक्तीच्या दोन्ही अधिसूचना सरकारने रद्द केल्यानिमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळीतील एनएससीआय डोम इथे ५ जुलैला विजयी मेळावा आयोजित केला असून, तो यशस्वी व्हावा यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मनसेकडूनही समाजमाध्यमांवर एक पोस्ट करण्यात आली असून, त्यात म्हटले आहे की महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा!
मराठी भाषा, अस्मिता आणि हक्काच्या लढ्याचा विजय म्हणून हा मेळावा घेतला जात आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर दिसतील. यासाठी दोघांनीही पहिल्यांदाच एकत्र आवाहन केले आहे. सुरुवातीला वाजत गाजत या, असे म्हटले होते. त्यानंतर आता आणखी एक निवेदन काढण्यात आले असून, त्यात ‘ही सुरुवात आहे’ असे म्हणत विजयी मेळाव्यासाठी खुले आमंत्रण दिले आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून समाजमाध्यमांचा वापर करून जोरदार प्रसिद्धी केली जात आहे. राज आणि उद्धव ठाकरेंचे लोकांना आवाहन करणारे पहिले एकत्र आवाहन पत्र सध्या व्हायरल झाले आहे. त्यात ‘सरकारला मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करीत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजतगाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय...!’ असे म्हटले आहे. दुसऱ्या आवाहनात राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी म्हटले, की ‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला मराठी बोलताना पाहायचे असेल तर मग ही सुरुवात आहे. विजयी मेळाव्यासाठी आपल्याला जाहीर आमंत्रण आहे.’
...
पक्ष स्तरावर जोरदार प्रयत्न
मेळावा यशस्वी व्हावा यासाठी दोन्ही पक्षांनी पक्ष स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मेळाव्यापर्यंत आणण्याची जबाबदारी पक्षाचे आमदार, पदाधिकाऱ्यांवर दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाने मेळाव्याची सर्व जबाबदारी आमदार अनिल परब यांच्यावर सोपवली आहे, तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. त्यांच्याकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन सुरू आहे. मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन होणार असून, त्यासाठी गर्दी जमवून मेळावा यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना आपली ताकद दाखवून एक प्रकारे येऊ घातलेल्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
...
दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर मेळाव्याची जबाबदारी आहे. आज आम्ही वरळी डोमची पाहणी करून नियोजन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नेता आणि पदाधिकारी झटून कामाला लागला आहे. मराठी जनांमध्येदेखील उत्साह असून, न भूतो न भविष्यति असा हा मेळावा होईल.
- संदीप देशपांडे, नेते, मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT