अभिनेत्रीच्या मुलाची आत्महत्या
मुंबई : शिकवणीला जाण्यास जबरदस्ती केल्याने गुजराती अभिनेत्रीच्या अल्पवयीन मुलाने कांदिवली येथील सी ब्रूक इमारतीच्या ५६ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. २) संध्याकाळी ६च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत पुढील चौकशी तपास सुरू केला आहे. बुधवारी संध्याकाळी शिकवणी चुकवून १४ वर्षीय मुलगा इमारतीखाली जमलेल्या मित्रांसोबत खेळायला जात असताना अभिनेत्री त्याला ओरडली. त्यानंतर मुलाने हेे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.