मुंबई

राज्य सहकारी शिक्षण संघाचा शिक्षण निधी पूर्ववत करा

CD

राज्य सहकारी शिक्षण संघाचा
शिक्षण निधी पूर्ववत करा : प्रवीण दरेकर
मुंबई, ता. ९ : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद केलेला निधी पुन्हा सुरू करावा, अशी मागणी विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली. पुरवणी मागण्यांवर ते बोलत होते.
या संघातर्फे प्रशिक्षण देण्याचे काम होते व त्याला पूर्वी शिक्षण निधी मिळत होता. राज्यात दोन ते अडीच लाख संस्था असून, त्या शिक्षण निधी देत असत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सहकारी बोर्डाचे काम चालत असे, पण मविआ सरकारच्या काळात हा निधी बंद करण्यात आल्याने संघाच्या ७०० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशिक्षणाला केंद्र व राज्य सरकारने महत्त्व दिले असल्यामुळे हा निधी पूर्ववत करावा, अशी मागणी दरेकर यांनी केली.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे पुरांमुळे होरपळलेले आहेत. त्यासंदर्भातील विकासकामे संथ गतीने होत आहेत. अशा स्थितीत महाडसारख्या ठिकाणी आपत्कालीन निवारा केंद्र उभारावे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये लोकांना निवारा मिळेल, असेही दरेकर यांनी दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणाला गद्दार म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो; विधानसभेत मंत्री देसाई आणि परब यांच्यात जुंपली, सभागृहात राडा

Maharashtra : गणेशोत्सव राज्याचा उत्सव, अधिवेशनात मोठी घोषणा; व्यवस्थेसाठी लागेल तेवढा निधी देऊ, सांस्कृतिक मंत्री काय म्हणाले?

Youtube New Rules : यूट्यूबच्या नियमात मोठा बदल! मेहनत करून बनवलेल्या 'या' व्हिडीओंची कमाई बंद, मोनेटायझेशनसाठी भयानक अटी व शर्ती..

सायली संजीव कुठेय? स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर; चेतन वडनेरेसोबत दिसतेय 'ही' अभिनेत्री; वाचा कथा

Capricorn Perfect Partner: मकर राशीसाठी कोण आहे परफेक्ट मॅच? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत होईल नातं सखोल

SCROLL FOR NEXT