मुंबई

अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा भारत दौरा

CD

अमेरिकेच्या परराष्ट्र
अधिकाऱ्यांचा भारत दौरा
मुंबई, ता. १० ः अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार विभागाच्या उपसहाय्यक सचिव बेथनी मॉरिसन नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिनेच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची ही पहिलीच भारत भेट आहे.
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात व्यापार करारावर चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे.या दौऱ्यात मॉरिसन यांनी नवी दिल्ली, धरमशाला आणि मुंबईला भेट दिली. अमेरिका-भारतदरम्यान धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी महत्त्वाच्या भागधारकांशी त्यांनी संवाद साधला. नवी दिल्लीतील भेटीदरम्यान मॉरिसन यांनी भारत सरकारच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी भेट घेऊन ट्रम्प प्रशासनांतर्गत अमेरिका-भारत संबंधांमधील प्रगतीवर चर्चा केली. दरम्यान, मॉरिसन यांनी दलाई लामा यांच्या ९०व्या वाढदिवसाला उपस्थित राहत तिबेटी प्रतिनिधींशी भेट घेतली. तिबेटच्या धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिक ओळखीचे जतन आणि तिबेटी लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्यांचे संरक्षण याबाबत अमेरिकेच्या समर्थनाला अधोरेखित केले. मुंबई भेटीदरम्यान त्यांनी तंत्रज्ञान, औषधनिर्माण, उद्योग, शैक्षणिक आणि वित्तीय क्षेत्रातील आघाडीच्या उद्योजकांशी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चिंचपोकळीचा चिंतामणीही मार्गस्थ

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : कल्याणमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरली

SCROLL FOR NEXT