मुंबई

लिफ्ट शाफ्टमध्ये कोसळून एकाचा जागीच मृत्यू

CD

लिफ्ट शाफ्टमध्ये कोसळून एकाचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : वडाळ्यातील मातोश्री सदन या इमारतीच्या लिफ्ट शाफ्टमध्ये पाचव्या मजल्यावरून कोसळून रहिवासी जागीच ठार झाला. ही घटना रविवारी (ता. १३) सकाळी ८:३० वाजता घडली. सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावामुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत माहिती देताना स्थानिक माजी नगरसेवक अमेय घोले यांनी सांगितले, ‘इमारतीमध्ये लिफ्टसाठी जागा ठेवण्यात आली आहे. त्यात अद्याप लिफ्ट बसवलेली नाही. इमारतीत लिफ्ट बसवलेली नसताना संबंधित शाफ्ट मात्र पूर्णपणे उघडा होता. तिथे कोणतेही अडथळे, सूचना फलक किंवा सुरक्षारक्षक नव्हते. या बेजबाबदारपणामुळेच एका निरपराध नागरिकाचा जीव गेला आहे.’ एसआरएला लिफ्ट व सुरक्षेच्या बाबतीत लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. दोन आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांसोबत लिफ्ट पाहणी झाली होती; मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही,’ असे सांगण्यात आले. ‘‘हा अपघात नसून व्यवस्थेतील गंभीर बेजबाबदारपणा आहे. दोषींवर तत्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी अमेय घोले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंगलातच मुलींचा जन्म, वडील कोण? २०१८पासून जंगल, गुहेत कशी राहिली रशियन महिला

Crocodile: ‘कृष्णा’नंतर आता कोयनेलाही ‘मगर’मिठी; कऱ्हाडला नागरिकांत औत्सुक्य अन् घबराट; पावसाळ्यात पाणी वाढल्‍याने वावर

Chhagan Bhujbal : राज्यसभेच्या प्रश्नावर भुजबळांचं मिश्किल उत्तर; शिळ्या कढीला ऊत कशाला आणता?

ATM Centre Theft : शेतकऱ्यांनो काळजी घ्या, एटीएम सेंटरमध्ये हातचलाखीने शेतकऱ्याला ४७ हजारांना लुटलं

"त्यांनी माझ्या वडिलांचं करिअर खराब केलं" डब्बू मलिकच्या लेकाचा काका अनु मलिकवर आरोप; "त्यांनी.."

SCROLL FOR NEXT