मुंबई

१२ हजार हॉटेल, बारचा आजच्या बंदमध्ये सहभाग!

CD

१२ हजार हॉटेल, बारचा आजच्या बंदमध्ये सहभाग

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई,  ता. १३ : महाराष्ट्र सरकारच्या मद्यावरील करवाढीविरोधात हॉटेलचालकांनी उद्या सोमवारी (ता. १४) संप करण्याची घोषणा केली आहे. या राज्यव्यापी बंदमध्ये ११,५०० हून अधिक हॉटेल, बार सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
 हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडियाच्या माहितीनुसार, पालघर, वसई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लोणावळा, महाबळेश्वर आणि नाशिकसह राज्यातील प्रादेशिक हॉटेल असोसिएशनने हॉटेलमधील बार आणि अल्कोहोल सेवा बंद ठेवण्यास पूर्ण पाठिंबा दिला आहे.  हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष जिमी शॉ म्हणाले, की ही करवाढ हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी अस्तित्वाच्या धोक्यापेक्षा कमी नाही. अनेक आस्थापनांसाठी या तिहेरी आघातामुळे दुकान बंद करण्याशिवाय कोणता पर्याय नाही. मुंबई, पुणे, लोणावळा, अलिबाग, नाशिक आणि इतर प्रमुख ठिकाणी हॉटेलमधील रेस्टॉरंट्स आणि बार हे पर्यटन आणि व्यावसायिक आतिथ्य पायाभूत सुविधांचा कणा आहेत. प्रस्तावित करांसह महाराष्ट्र बार चालवण्यासाठी देशातील सर्वांत महागड्या ठिकाणांपैकी एक बनेल आणि ऑपरेटर आणि पर्यटक दोघांनाही किंमत मोजावी लागेल.
...
हा बंद कशासाठी?
उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांची मोठी वाढ,  एफएल आउटलेटवर विकल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या परदेशी दारूवर १० टक्के मूल्यवर्धित कर लादणे, चालू आर्थिक वर्षासाठी एफएल तीन परवाना शुल्कात १५ टक्क्यांनी वाढ करणे, या कारणांसाठी बंद पुकारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ATM Centre Theft : शेतकऱ्यांनो काळजी घ्या, एटीएम सेंटरमध्ये हातचलाखीने शेतकऱ्याला ४७ हजारांना लुटलं

"त्यांनी माझ्या वडिलांचं करिअर खराब केलं" डब्बू मलिकच्या लेकाचा काका अनु मलिकवर आरोप; "त्यांनी.."

एकच झलक, सबसे अलग! 'Vivo X Fold 5' अन् 'Vivo X200 FE' स्मार्टफोनची भारतात एन्ट्री; परवडणारी किंमत, दमदार फीचर्स एकदा बघाच..

म्हणून मला तो व्हिडिओ बनवावा लागला... शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेने पुन्हा मांडली बाजू

Marathi Book Review: 'दि फायर ऑफ सिंदूर' : भारताचा दहशतवादावर प्रहार

SCROLL FOR NEXT