मुंबई

कोकणच्या आर्थिक विकासासाठी सरकारने ‘वॉटर ग्रीड’ तयार करावे : प्रविण दरेकर

CD

कोकणच्या आर्थिक विकासासाठी सरकारने ‘वॉटर ग्रिड’ तयार करावे : प्रवीण दरेकर

मुंबई, ता. १५ : कोकणचा आर्थिक विकास करण्यासाठी तसेच कोकणातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कोकणात वॉटर ग्रिड तयार करावे, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (ता. १५) विधान परिषदेत केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रिड’ संकल्पना मांडली, त्यावर कामही सुरू आहे. त्याचप्रमाणे कोयनेच्या वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे ६७ टीएमसी पाणी वीजनिर्मितीनंतर बोगद्यातून वशिष्ठी नदीत सोडले जाते आणि हे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे पाणी जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला मिळाले, पाइपलाइनद्वारे हे पाणी तिन्ही जिल्ह्यांत फिरवले तर कोकणातील पाणीटंचाई कायमची दूर होईल. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे कोकणच्या समृद्धीसाठी कोकण वॉटर ग्रिड होणे अत्यंत गरजेचे आहे. कोकणच्या आर्थिक विकासाला गती द्यायची असेल, कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यायचे असेल तर शासनाने कोकण वॉटर ग्रिड तयार करावे, असे दरेकर म्हणाले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या २६० अन्वये एकत्रित प्रस्तावावर ते बोलत होते.

कोकणात बंधाऱ्यांची गरज
कोकणात शेतीसाठी अनुकूल हवामान आहे. नैसर्गिक साधनसामग्री उपलब्ध आहे. येथील हवामान अन्नधान्य व फळबाग लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. पण मर्यादित स्वरूपातील सिंचन सुविधा ही सर्वात मोठी अडचण कोकणात आहे. कोकण अतिविपुल पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या एकूण जलसंपत्तीच्या ४६ टक्के पाणी एकट्या कोकणात पडते. पण पाणी थांबवण्याच्या सुविधा कोकणात नसल्यामुळे हे सर्व पाणी वाहून जाते. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर विजय बंधारे व अन्य बंधारे बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने भरीव निधी द्यावा, अशी मागणी दरेकरांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: ''गौरव मोरेसुद्धा घाबरलेला'', प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

Nishikant Dubey : मराठी जनतेचा अपमान; मनसेची खासदार निशिकांत दुबे यांना मानहानीची नोटीस

'वॉर 2' चा धमाकेदार पोस्टर रिलीज, हृतिक, ज्युनियर एनटीआर, कियाराची जबरदस्त झलक!

Buldhana Crime : अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून; पेनटाकळी धरणात आढळला होता मृतदेह, आरोपीला अटक

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेस्ला इलेक्ट्रिक कारमध्ये सवार!

SCROLL FOR NEXT