सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : बर्मिंगहॅम, अलाबामा (अमेरिका) येथे मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाने ताकद आणि कौशल्य सिद्ध करत आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे पदक मिळवले. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतील ४७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता
२८ जून ते ६ जुलै या कालावधीत ही स्पर्धा झाली. मुंबई अग्निशमन दलाचे ६ जणांचे पथक यात सहभागी झाले होते. या पथकाचे नेतृत्व उप-मुख्य अग्निशमन अधिकारी आणि आयर्नमॅन डॉ. दीपक घोष यांनी केले. त्यांनी वैयक्तिक ५५ वयोगटातील अल्टीमेट फायर फायटर स्पर्धेत कांस्यपदक पटकावले, तसेच फायर फायटर चॅलेंज या सांघिक स्पर्धेतही भारताला कांस्यपदक मिळाले. तर महिला अग्निशामकांमध्ये डब्ल्यूएफएम उन्नती चिलकेवार यांनी स्टेअर रेस कॅज्युअल वेअर प्रकारात रौप्यपदक मिळवले. डब्ल्यूएफएम श्वेता दवणे यांनी फुल गियर स्टेअर रेसच्या सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले. या विजेत्यांसोबत एकता गौलकर, सिद्धी सोनवणे आणि फायरमन गोविंद बिजले यांनीही संघाचे प्रतिनिधित्व केले. या जागतिक स्पर्धेत भारताने ५८८ पदकांसह तिसरे स्थान मिळवले. त्यात २८० सुवर्ण, १७८ रौप्य आणि १३० कांस्यपदकांचा समावेश होता.
--------------------------------------
शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस
जगभरातील सुमारे ७० देशांतील ५००० हून अधिक खेळाडूंनी ६० पेक्षा अधिक खेळांमध्ये भाग घेतले होते. या स्पर्धांमध्ये मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी शारीरिक व मानसिक क्षमतेचा उच्चतम कस पार केला. या स्पर्धांमध्ये ४-५ टप्प्यांतील कठीण कार्य, धुरात धावणे, वजन उचलणे, बचावकार्य आणि जलद प्रतिसाद कौशल्यांची कसोटी पाहिली जाते.
-----------------------------------------
देशासाठी गौरवाची बाब
मुंबई अग्निशमन दलातील यशस्वी खेळाडूंचा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी देशाच्या सुरक्षा यंत्रणेतील कर्तव्यनिष्ठ, धाडसी आणि फिटनेस जवानांचा गौरव झाला. ही कामगिरी केवळ मुंबईसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी गौरवाची बाब आहे. ती पुढील पिढीतील अग्निशामकांसाठी प्रेरणादायक ठरेल.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.