मुंबई

पालघरमध्ये उभारणार उच्चदाब वीज केंद

CD

पालघरमध्ये उभारणार उच्चदाब वीज केंद्र
ग्रोथ हबसाठी निर्णय; अखंड वीजपुरवठा होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : केंद्र सरकारकडून मुंबईसह एमएमआर क्षेत्रात ग्रोथ हब उभारले जाणार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, डेटा सेंटर, सेवा क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याची तयारी म्हणून आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेड पालघर जिल्ह्यात वेळगाव पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडच्या माध्यमातून ४०० केव्हीचे जीआयएस उच्चदाब वीज केंद्र उभारणार आहे. त्यानुसार केंद्राची उभारणी आणि संचालनासाठी महापारेषणसह सात कंपन्या इच्छुक असल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी देशभरात महाराष्ट्र (एमएमआरमध्ये), गुजरात, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांत ग्रोथ हब उभारणार आहे. या हबमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग, आयटी कंपन्या, सेवा क्षेत्र असणार आहेत. त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार निवारा, वाहतुकीच्या सुविधांसह वेगवेगळ्या प्रकारच्या पूरक सोयीसुविधा उभाराव्या लागणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे राज्यातील वीज केंद्रातील वीज एमएमआरमध्ये वाहून आणून ती वाढवण बंदर, डेटा सेंटर, उद्योगधंद्यांना पुरवणे शक्य होणार आहे. त्यामुळे त्याचे नियोजन करून योग्य रीतीने विजेचा पुरवठा करता यावा म्हणून वेळगाव इन्ट्रास्टेट योजनेत पालघरजवळ वेळगाव येथे नवीन ४००/२२० केव्ही जीआयएस सबस्टेशन उभारले जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक बोलीच्या आधारे सात कंपन्या उभारणी आणि संचलनासाठी पात्र ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...
महापारेषणच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी!
महाराष्ट्रात उच्चदाब वीजवाहिन्यांचे संपूर्ण नेटवर्क महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडचे (महापारेषण) आहे. तरीही केंद्रीय ऊर्जा विभागाने आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेडने पालघर जिल्ह्यात वेळगाव पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडच्या वीज उपकेंद्र उभारण्यासाठी घेतलेला पुढाकार म्हणजे एक प्रकारे महापारेषणच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी असल्याचे बोलले जात आहे.
...
तांत्रिक बोलीच्या आधारे पात्र कंपन्या
- पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
- अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड
- रेसोनिया लिमिटेड (पूर्वी स्टरलाइट ग्रिड ३२ लिमिटेड)
- टाटा पॉवर कंपनी लिमिटेड
- केसीसी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड
- सीगल इंडिया लिमिटेड
- महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati Visarjan Rath: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रथ सज्ज

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Ganpati Visarjan 2025 Live Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

SCROLL FOR NEXT