मुंबई

वाराणसी स्फोटानंतर उत्तरप्रदेशात ७/११ चा कट

CD

वाराणसी स्फोटानंतर उत्तर प्रदेशात ७/११चा कट

२००८मध्ये मुंबईच्या सादिक शेखच्या चौकशीतून समोर आली होती दुसरी बाजू

मुंबई, ता. २२ : ७/११ बॉम्बस्फोट मालिकेच्या खटल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गोळा केलेला प्रत्येक पुरावा धुडकावून लावत १२ आरोपींचा या गुन्ह्यातील सहभागाचा आरोप उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे २००८मध्ये मुंबई गुन्हे शाखा आणि गुजरात एटीएसने केलेल्या तपासात पुढे आलेला दावा खरा होता का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

मुंबईतील बॉम्बस्फोट मालिका नव्याने उदयास आलेल्या इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी संघटनेने घडविली होती. या गुन्ह्यात सहभागी असलेला प्रत्येक आरोपी भारतीय होता. या कृतीचा कट २००५मधील वाराणसी बॉम्बस्फोटानंतर उत्तर प्रदेश येथील सराईमीर या गावात शिजला, असे तपशील या दोन्ही यंत्रणांच्या तपासातून पुढे आले होते. विशेष म्हणजे या बॉम्बस्फोट मालिकेचा मास्टरमाइंड आणि इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा सहसंस्थापक सादिक इसरार शेख याने गुजरात एटीएसच्या चौकशीत तशी कबुली दिली होती. या जबाबात त्याने संघटनेची स्थापना, पदानुक्रम, साथीदार आणि २००५पासून २००८पर्यंत देशभरात घडवलेले बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कृतींची इत्थंभूत माहिती दिली होती. या घडामोडीमुळे ११ जुलै २००६ रोजी पश्चिम उपनगरीय रेल्वेत घडलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत पाकिस्तानहून भारतात शिरलेल्या १० ते १२ लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांचा सहभाग होता, या महाराष्ट्र एटीएसच्या दाव्याला छेद मिळाला होता.

२००८मध्ये गुजरातच्या अहमदाबाद शहरात तासाभरात २१ बॉम्बस्फोट घडले होते. पुढील तपासात पोलिसांना तितकेच स्फोट न झालेले बॉम्ब सापडले. या स्फोटांत ५६ जणांचा मृत्यू तर दोनशेहून अधिक नागरिक जखमी झाले. या हल्ल्यानंतर विविध राज्यांच्या पोलिस यंत्रणांनी समन्वय ठेवून आक्रमक शोधमोहीम हाती घेतली. त्यात मुंबई गुन्हे शाखेने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्लीसह अन्य राज्यांतून २५हून अधिक आयएमच्या संशयित अतिरेक्यांना अटक केली. सादिक शेख त्यातलाच एक होता. या कारवाईनंतर तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी पत्रकार परिषद घेत अटक आरोपींनी २००५ ते अटक होईपर्यंत (२००८) देशातील सर्व बॉम्बस्फोट घडविल्याचे स्पष्ट केले होते.


कट आणि कारवाई
- गुजरात (कच्छ), नेपाळ आणि बांगलादेश सीमेवरून भारतात शिरलेल्या लष्कर ए तोयबाच्या १० पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतात स्थायिक १८ जणांच्या मदतीने ७/११ बॉम्बस्फोट मालिका घडवली, असा दावा एटीएसने केला.
- सादिकने दिलेल्या जबाबानुसार २००५मध्ये इंडियन मुजाहिद्दीनची स्थापना होताच वाराणसीला लक्ष्य केले गेले. संघटनेच्या उत्तर प्रदेश, दिल्ली येथील साथीदारांनी वाराणसी रेल्वे स्थानक आणि संकट मोचन हनुमान मंदिरात बॉम्बस्फोट घडवले. या स्फोटाचा मास्टरमाइंड आतिफ अमीन आणि सादिक उत्तर प्रदेशातील सराईमीर गावातील ठिकाण्यावर एकत्र होते. या स्फोटाच्या यशामुळे अशी मालिका आणखी अचूकरीत्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत घडवावी, ही कल्पना पुढे आली. तेथेच कट शिजला. मुंबई, उत्तर प्रदेशातील आवश्यक त्या साथीदारांना या कटात सहभागी करून घेण्यात आले. पुढे दिल्लीच्या बाटला हाउस इमारतीत झालेल्या चकमकीत आतिफ ठार झाला.

बॉम्ब कुठे बनवले
एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यानुसार आरोपी अली आलमने बॉम्बसाठी लागणारे साहित्य आणि पाकिस्तानातून आलेल्या साथीदारांच्या निवाऱ्यासाठी गोवंडीच्या शिवाजीनगर येथे स्वतःची झोपडी देऊ केली होती. तेथेच पाकिस्तानी सहकाऱ्यांच्या मदतीने बॉम्ब बनविण्यात आले. आरोपी साजिद अन्सारी आणि आसिफ खान यांनी अमोनियम नायट्रेट, खिळे, बॉल बेरिंग, सर्किट इत्यादी साहित्य खरेदी केले. तर लष्कराचा तथाकथित वेस्टर्न इंडिया कमांडर फैजल शेख याने स्वतःच्या मारुती कारने आरडीएक्स आणि अन्य साहित्य गोवंडीपर्यंत वाहून आणले.
.......
३५ किलो स्फोटके मंगळूरला पाठवली
सादिकने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या आमिर रझा याने रियाज भटकळच्या माध्यमातून सुमारे ३५ किलो स्फोटके कर्नाटकच्या मंगळूर जिल्ह्यात पाठवली. संघटनेचा ऑपरेशनल कमांडर आतिफ अमीन याने मंगळूरहून स्वतः हे साहित्य घेतले आणि शिवडी येथे आणले. साथीदार अबू राशिद याने शिवडी येथे भाड्याने खोली घेतली होती. तेथेच सादिक, अमीन यांनी बॉम्ब तयार केले.

..
बॉम्बची पेरणी
दोन भारतीय आणि एक पाकिस्तानी असे सात चमू करून प्रत्येकाने सात लोकलमध्ये बॉम्ब ठेवले. बॉम्ब पेरणीनंतर काही टॅक्सीने गोवंडीच्या झोपडीत परतले. सादिकने दिलेल्या माहितीनुसार शिवडी येथूून तो टॅक्सीने दादर येथे आला. लोकलने चर्चगेट येथे चारच्या सुमारास पोहोचला. सर्व बॉम्ब साडेसहा वाजता एकाचवेळी फुटतील, अशी बांधणी करण्यात आली होती. त्याने तीन बॉम्ब स्वतः पेरले, असा दावा सादिकने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND 4th Test: 'गिलने आज कर्णधार म्हणून आदर मिळवण्याची संधी गमावली', करुण नायरला वगळल्याने माजी खेळाडू बरसला

Pune News : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे स्वातंत्र्यदिनी होणार उद्‍घाटन

Vande Bharat Train: वंदे भारतमध्ये २७ जुलैपासून होणार बदल, प्रवाशांना होणार फायदा; वाचा सविस्तर

Karad News : मराठी-हिंदी भाषेवरुन मंत्री मंगलप्रभात लोढांचा ठाकरे बंधुना खोचक टोला, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates: कारंजा आगारात ५ नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल

SCROLL FOR NEXT