जीवघेण्या अपघातांच्या संख्येत घट
वाहतूक पोलिसांच्या विविध योजनांचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : राज्यात दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या संख्येसह रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या होत्या; मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा जीवघेण्या अपघातांची संख्या घटली आहे; मात्र राज्यातील अपघातांच्या संख्येत नगण्य वाढ झाली आहे, तर मृत्यूमध्ये घट झाली.
सध्या राज्यात साडेतीन कोटींहून अधिक वाहने रस्त्यांवर धावत आहेत. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये आयुर्मान पूर्ण झालेल्या वाहनांतून प्रवासी वाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसविणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही कारणे आहेत. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आरटीओसह वाहतूक पोलिस विविध योजना राबवित आहेत, त्यामुळे यंदा त्यामध्ये घट झाली आहे.
राज्यातील आकडेवारी
कालावधी - जानेवारी ते जून २०२४
जानेवारी ते जून २०२५
जीवघेणे अपघात - मृत्यू
७,६७४ - ८,३०२
७,६९५ - ८,२७६
गंभीर अपघात - जखमी
७,५१८ - ११,३०८
७,८४९ - १२,०६८
किरकोळ अपघात - जखमी
२,४५६ - ४,३९४
२,२०७ - ४,१६७
एकूण अपघात
१८,८५६
==
अपघात आकडेवारी
वर्ष - अपघात - मृत्यू
२०१९ - ११,७८७ - १२,७८८
२०२० - १०,७७३ - ११,५६९
२०२१ - १२,५५४ - १३,५२८
२०२२ - १४,०५८ - १५,२२४
२०२३ - १४,११९ - १५,३६६
२०२४ - १४,५६३ - १५,७१५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.