Latest Marathi News Live Update
esakal
Devendra Fadanvis : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण येथे कृतज्ञता मेळाव्यासाठी येत आहेत.
या मेळाव्या मध्ये फलटण मधील विविध विकास कामांचं ऑनलाईन भूमिपूजन सुद्धा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित राहणार आहेत.
गेल्या दोन दिवसापासून फलटणमध्ये डॉक्टर महिला आत्महत्याचे प्रकरण गाजत असताना आज मुख्यमंत्री फलटणमध्ये येत असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भंडाऱ्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण दौऱ्यावर आहेत.येथे त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण केले जाणार आहे.
सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दानदान उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेलं शेकडो क्विंटल सोयाबीन भिजलं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर शहरातील बस स्थानकावर प्रवासी घेऊन आल्यानंतर उभे असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यावेळी प्रसंगावधान राखत प्रवासी बस मधून बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळाली यामुळे बसचे पूर्णपणे नुकसान झाले.
मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांची मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील तिच्या मूळ गावी जात भेट घेतली. माध्यमांशी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं मी आता संपुर्ण माहिती घेतली आहे. तिच्या जुन्या काही कंप्लेंट आहेत. तिच्यावर झालेल्या अन्यायमध्ये कोण आहे किंवा नेमकं काय घडलंय याबाबत चौकशी होणं गरजेचं आहे.
दिवाळीनंतर मुंबई - पुण्यात परतण्याची लगबग सुरू झालीय. यामुळे महामार्गावर कोंडीची शक्यता आहे. यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. दिवाळीत मूळ गावी गेलेले शहरवासीय पुणे मुंबईकडे परतण्यास सुरुवात झालीय. या प्रवाशांच्या मोटारी खाजगी बस यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस पुणे पोलीस तसेच पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक आणि वाहन चालकांना महामार्ग यांच्यापर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा अशा सूचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.