मुंबई

स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी लिंक रोड पुलाचे काम

CD

विक्रोळी लिंक रोड पुलाचे
काम एमएमआरडीएकडे
मुंबई, ता. २९ : स्वामी समर्थनगर ते विक्रोळी हायवेपर्यंतचा लिंक रोड उड्डाणपूल आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सोपवण्यात आला आहे. यापूर्वी या उड्डाणपुलाचे काम मुंबई महापालिका करीत होती. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी एकूण ७६८.८५ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च पालिका करणार आहे.

स्वामी समर्थनगर ते विक्रोळी हायवेपर्यंतच्या लिंक रोड उड्डाणपुलाचे काम मुंबई महापालिकेने आता एमएमआरडीएकडे सोपवले आहे. याच मार्गावर मेट्रो ६च्या कामासाठी एमएमआरडीएने काम सुरू केल्याने दोन्ही प्रकल्प एकमेकांच्या आड येऊ लागले आणि त्यामुळे समन्वयाचा अभाव निर्माण झाला होता.

मेट्रो आणि उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांचे काम एकाच यंत्रणेकडून होणार असल्याने समन्वय साधणे सोपे जाणार आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी एकूण ७६८.८५ कोटी रुपये खर्च येणार आहे. यातील १०० टक्के निधी पालिकेकडून देण्यात येणार आहे. याअंतर्गत पालिकेने यापूर्वी एमएमआरडीएला ३८४.५० कोटी रुपये आगाऊ दिले आहेत. उर्वरित ३७४.३५ कोटी रुपयांचा प्रस्तावही महापालिका प्रशासनाने आता मंजूर केला आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणारा हा उड्डाणपूल लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यासाठी मला कुणीही फोन केला नाही, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला तेव्हा..'' मोदींनी लोकसभेत सांगितला किस्सा

PM Modi Parliament : ‘’ज्यांना भारताची बाजू दिसत नाही त्यांना मी...’’ ; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत थेट इशारा!

Latest Maharashtra News Updates: मुंबईवरील हल्ल्यानंतरही काँग्रेसने पाकिस्तानसोबत व्यापारी करार केले- मोदी

Rahul Gandhi: ''मोदींमध्ये हिंमत असेल तर...'', ट्रम्प यांचं नाव घेऊन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

ENG vs IND, Video: गौतम गंभीर का तापला? ओव्हलच्या क्युरेटरची प्रतिक्रिया आली समोर; म्हणाले, 'मी पहिल्यांदाच...'

SCROLL FOR NEXT