मुंबई

‘पॉथोल्स’वर मुंबईकरांचा विस्फोट :

CD

‘पॉथोल्स’वर तक्रारींचा पाऊस
एका दिवसात खड्ड्यांबाबत ४०५ तक्रारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईकरांचा खड्ड्यांवरील संताप आता थेट मोबाईलवर दिसू लागला आहे. महापालिकेच्या ‘पॉथोल्स’ ॲपवर फक्त एका दिवसात तब्बल ४०५ तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून, त्यावरील तत्काळ कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. पालिकेने नोंद घेतली असली तरी प्रत्यक्षातील कामगिरीवर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.

महापालिकेने खड्ड्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विकसित केलेल्या ‘पॉथोल्स’ ॲपवर आतापर्यंत तब्बल ६,५२८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ५,०१३ खड्ड्यांचे निवारण केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. याचा अर्थ ७४.८ टक्के तक्रारींचा निपटारा झालेला आहे, तर १५१५ खड्डे अद्याप भरायचे बाकी आहेत. त्यावरही काम सुरू आहे. याशिवाय १,५८० तक्रारी या चुकीच्या किंवा त्या संबंधित रस्ते विभागाच्या अखत्यारीत नसल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

जुलै महिन्यात खड्ड्यांबाबत ४,८४२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील ४१४ तक्रारी इतर यंत्रणांशी संबंधित असल्याने त्या संबंधित यंत्रणांकडे वर्ग केल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे फक्त सोमवारी (ता. २८) एका दिवशी ४०५ नव्या खड्ड्यांच्या तक्रारी नागरिकांनी नोंदवल्या आहेत. यावरून मुंबईकरांचा त्रास आणि महापालिकेवरील दबाव स्पष्टपणे दिसून येतो. सध्या पावसाने उघडीप घेतल्याने खड्डे भरायच्या कामांना गती देण्यात आली आहे. अगदी रात्रीदेखील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे; मात्र पाऊस सुरू झाला की पुन्हा रस्ते खड्डेमय होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेत 4,800 कोटींचा सर्वात मोठा घोटाळा; महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Latest Maharashtra News Updates : त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी खडतर वाट, खड्ड्यांमुळे होतोय भक्तांचा मनस्ताप

Home Loan: 50 लाखांच लोन... 30 नव्हे फक्त 17 वर्षांत फेडा; 34 लाखांची बचत होईल, समजून घ्या गणित

Asia Cup 2025: कितीही विरोध करा, India vs Pakistan मॅच रद्द होणार नाहीच! १४ सप्टेंबरला लढत होणार, कारण...

Kharadi Rave Party: रेव्ह पार्टीची व्याख्या काय? एकनाथ खडसेंचा पुणे पोलिसांना सवाल; म्हणाले, मग राज्यात कुठेही घरात...

SCROLL FOR NEXT