मुंबई

टाटा रुग्णालयातच उपचार घ्यावे!

CD

टाटा रुग्णालयातच उपचार घ्यावे!
सार्कोमा रुग्णांना डॉ. पृथींचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : सार्कोमा कर्करोगाच्या रुग्णांनी टाटा रुग्णालयात किंवा कर्करोग प्रशिक्षित डॉक्टरांकडे उपचार घ्यावे, असा सल्ला खारघरच्या ॲक्ट्रेक केंद्रातील प्राध्यापक ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मनीष पृथी यांनी दिला आहे. प्रौढांमध्ये एक ते तीन टक्के, तर बालकांमध्ये १५ टक्के एवढे या कर्करोगाचे प्रमाण आढळते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

डॉ. पृथी यांनी सांगितले की, आमच्या क्लिनिकमध्ये किमान ३० टक्के रुग्ण बाहेरून उपचार घेतल्यानंतर येतात. त्यामुळे अनेकदा रुग्णांचे हातपाय कापावे लागतात. आमच्या बाह्यरुग्णांमध्ये दर आठवड्याला सुमारे २५ ते ३० नवीन रुग्ण येतात. टाटा आणि ॲक्ट्रेक मिळून दर महिन्याला सुमारे ६० रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णांनी योग्य ठिकाणी उपचार घेतल्यास त्यांचे हातपाय कापण्याची गरज पडणार नाही, असे डॉ. पृथी म्हणाले.

टाटा मेमोरिअल केंद्राच्या कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण विभागातर्फे (ॲक्ट्रॅक) ‘सार्कोमा जनजागृती महिन्या’निमित्त ‘लाइफ-लिंब फंक्शन’ या नावाने एक विशेष जनजागृती मेळावा नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात हाडे आणि सॉफ्ट टिश्यूत होणाऱ्या या दुर्मिळ कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना एकत्र आणत त्यांना प्रेरणा आणि माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील ‘वॉक फॉर लाइफ’ मोहिमेंतर्गत डॉक्टर, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavat Violence : पुण्यातील यवतमध्ये फेसबूक पोस्टवरून वाद; दोन गटात तणाव, पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर...

Ajinkya Rahane, चेतेश्वर पुजारा यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा दी एंड! टीम इंडियात पुनरागमन होणे अशक्य, मोठे अपडेट्स

Ganeshotsav 2025: गणेश मंडळांना दिलासा! महापालिकेचा १५ हजारांचा दंड अखेर रद्द

Vantara Team Meeting Kolhapur : ठिकाण ठरलं! नांदणी मठाचे महाराज, वनतारा टीमची होणार महत्त्वाची बैठक, महादेवी परतण्याची शक्यता!

Car Red Lines: गाडीच्या मागच्या काचेवर लाल रेषा का असतात? 'हे' आहे कारण

SCROLL FOR NEXT