अजिंक्य रहाणेने जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला
चेतेश्वर पुजारा याने जुन २०२३ मध्ये भारतासाठी शेवटची कसोटी मॅच खेळली
४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय संघाची घोषणा
Ajinkya Rahane & Cheteshwar Pujara have been ignored : भारतीय कसोटी संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा, यांनी पुनरागमनाची आस सोडलेली नाही. अजिंक्यने इंग्लंड दौऱ्यावर असताना तशी इच्छाही बोलून दाखवली होती आणि तो पुन्ही एकदा टीम इंडियाची जर्सी घालण्यासाठी उत्सुक आहे. पण, आता हाती आलेल्या बातमीनुसार अजिंक्यसह चेतेश्वरचेही टीम इंडियात परतणे अवघड दिसत आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आल्याचे सांगणारे हे वृत्त आहे.