
Jain Community Protests Elephant : नांदणी मठाला भेट देण्यासाठी दाखल झालेल्या वनताराच्या पथकाला कोल्हापूर पोलिसांनीच विमानतळावर थांबवले आहे. यावर भट्टारकांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. कोल्हापूर नांदणी मठातील महादेवी/माधुरी हत्तीला गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये हलवल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यामुळे नांदणीमध्ये हजारोबांधव मोठ्या संख्येने एकत्र येत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्षता घेतली आहे.