मुंबई

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्याविरोधात गुन्हा

CD

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्याविरोधात गुन्हा
व्यावसायिकाला ६०.४८ कोटींना फसविल्याचा आरोप
मुंबई, ता. १४ : व्यावसायिकाला तब्बल ६०.४८ कोटी रुपयांना फसवल्याच्या आरोपात आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री शिपा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्याविरोधात बुधवारी (ता. १३) गुन्हा नोंदवला. जुहूला राहणारे आणि लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्विसेस या खासगी वित्त संस्थेचे (एनबीएफसी) संचालक दीपक कोठारी यांच्या तक्रारीवर आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केल्यावर कुंद्रा दाम्पत्य आणि इतर सहभागी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला, असे सांगण्यात आले.
प्रथम खबरी अहवालानुसार (एफआयआर) कोठारी यांना त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या राजेश आर्य या अधिकाऱ्याने कुंद्रा दाम्पत्यास कर्ज हवे असल्याचे सांगितले. त्यानेच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कोठारी आणि कुंद्रा दाम्पत्याची भेट घालून दिली. या भेटीत कुंद्रा दाम्पत्याने त्यांच्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी वार्षिक १२ टक्के व्याजावर ७५ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली; मात्र कर वाचविण्यासाठी ही रक्कम गुंतवणूक स्वरूपात करावी. त्या बदल्यात नियमित परतावा आणि मुद्दल फेडले जाईल, असे आश्वासन कुंद्रा दाम्पत्याने दिले. त्यास कोठारी यांनी होकार दर्शविला.
ठरल्याप्रमाणे कोठारी यांनी एप्रिल २०१५मध्ये ३१.९५. कोटी तर काही दिवसांनी २८.५३ कंपनीच्या खात्यावर वळती केली. दरम्यान, २०१६मध्ये कोणतेही कारण किंवा हमी न देता शिल्पा शेट्टीने या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे कोठारी यांना मेलद्वारे कळवले.
पुढे २०१७मध्ये अन्य करारभंग केल्याने ही कंपनी दिवाळखोरीत गेल्याची माहिती कोठारी यांना मिळाली. त्यांनी कर्ज परताव्यासाठी कुंद्रा दाम्पत्याकडे पाठपुरावा सुरू केला; मात्र कोव्हिडचे निमित्त करून कुंद्रा दाम्पत्याने त्यांना ताटकळत ठेवले. अखेर कोठारी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT