मुंबईकरांची पाणीचिंता मिटली
सातही तलावांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाणीचिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये तब्बल ९५.७४ टक्के पाणीसाठा जमा झाला असून, पाणीकपातीची गरज नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा, भातसा, तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, विहार आणि तुलसी या सातही तलावांत पुरेसा पाणीसाठा जमा झाला आहे. विहार आणि तुलसी तलाव शंभर टक्के क्षमतेने भरले असून ते आता ओसंडून वाहण्याच्या स्थितीत आहेत. मध्य वैतरणा आणि भातसा तलावही जवळपास ९५ ते ९६ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. तानसा व मोडक सागर या तलावांमध्येही ९० टक्क्यांहून अधिक साठा आहे. दुसरीकडे अप्पर वैतरणा तलावाचा साठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. एकूणच मुंबईतील सर्व तलावांमध्ये १३.८५ लाख दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. हा साठा दरवर्षीच्या तुलनेत अधिक असून, शहराची पाण्याची गरजा सहज भागवू शकेल. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की मुंबईत सध्या पाण्याचा पुरेसा साठा आहे. जर पुढील काही आठवडे पावसाचा जोर कायम राहिला, तर उन्हाळ्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहील, त्यामुळे पाणीकपातीची गरज भासणार नाही.
पाणीपातळीत झपाट्याने वाढ
२०२४ मध्ये याच दिवशी मुंबईतील तलावांचा एकत्रित साठा सुमारे ९४ टक्के होता. तर २०२३ मध्ये हा आकडा ८४ टक्क्यांवर होता. यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने तलावांची पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर उन्हाळ्यापर्यंत पाणीटंचाईची टांगती तलवार राहणार नाही.
जलसाठा (२३ ऑगस्ट २०२५पर्यंत)
तलाव जलसाठा (एमएलडीमध्ये) टक्क्यांमध्ये
अप्पर वैतरणा २,१६,४३९ ९३.६३
मोडक सागर १,२८,९२५ १००
तानसा १,४३,६५२ ९९.०२
मध्य वैतरणा १,८६,४७९ ९६.३६
भातसा ६,७४,५११ ९४.०७
विहार २७,६९८ १००
तुलसी ८,०४६ १००
एकूण साठा १३,८५,७५१ ९५.७४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.