मुंबई

बाप्पाच्या दरबारात विजेचा झगमगाट!

CD

बाप्पाच्या दरबारात विजेचा झगमगाट!
मुंबईतील २१७२ मंडळांनी घेतली अधिकृत वीज जोडणी; घरगुती दराने होणार वीजपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबईसह उपनगरात यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात आणि भव्यदिव्य विद्युत रोषणाईत साजरा होणार आहे. त्याची तयारी म्हणून जवळपास २१७२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अदाणी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्टकडून तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी घेतली आहे. सदरची वीज त्यांना घरगुती दराने मिळणार आहे. परिणामी यंदा मुंबईत विजेचा झगमगाट दिसणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज लागते. त्यामुळे मंडळांनी खबरदारी घेत यंदा अधिकृतपणे वीजजोडणी घेतली आहे. त्यामध्ये उपनगरात अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून ९४५ मंडळांनी तात्पुरती वीजजोडणी घेतली आहे. टाटा पॉवरकडून २०० मंडळांनी, तर मुंबई शहरात बेस्टकडून १०३७ हून अधिक मंडळांनी वीजजोडणी घेतली आहे. संबंधित मंडळांना घरगुती दराने वीज मिळणार असल्याने गणेश मंडळांची मोठी अर्थिक बचत होणार आहे.

जनजागृती करणार
विजेच्या धक्क्याने अनेकदा अपघात घडतात. त्यामुळे सदरचे अपघात टाळण्यासाठी टाटा पॉवरकडून त्यांच्या सुरक्षा टीम सार्वजनिक सुरक्षितता आणि शाश्वत जीवनशैलीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी गणेश मंडपांमध्ये पथनाट्ये आयोजित करणार आहे. या पथनाट्यांमध्ये विद्युत सुरक्षा, रस्ता सुरक्षा, घरगुती सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मनोरंजक पद्धतीने चर्चा केली जाणार आहे.

अदाणी - ९४५
टाटा पॉवर - २००
बेस्ट - १०३७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

Latest Maharashtra News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

World Cup 2011 Final मध्ये युवराजच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्याचं खरं कारण काय? सचिन तेंडुलकरनेच सांगितलं सत्य

Selfie death: सेल्फीमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल; २७१ बळी, इतर देशांमध्ये काय परिस्थिती?

Pig: जगभरात सर्वाधिक वराह कोणत्या देशात आहेत? भारतातले कोणते राज्य आहे आघाडीवर?

SCROLL FOR NEXT