भायखळ्यातील टाॅवरला
काम थांबवण्याची नोटीस
दाेन मजले बेकायदा असल्याचे उघड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : भायखळ्यातील अनेक टॉवर बेकायदा असल्याचे उघड झाले आहे. बेकायदा बांधकामाप्रकरणी त्यातील चार टॉवरना पालिकेच्या ई वार्डने नोटीस बजावली आहे. भायखळ्यातील ‘द रेसिडेन्सी’ या टॉवरमध्ये दोन मजले बेकायदा असल्याचे आढळले आहेत. या प्रकरणी पालिकेने या टाॅवरला काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे.
भायखळ्यात काही टॉवरमध्ये बेकायदा बांधकाम केल्याच्या तक्रारी ई वार्डकडे आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन अशा टॉवरना नोटीस बजावण्यात सुरुवात केली आहे. मोरलॅँड रोड (ई-वार्ड) येथील द रेसिडेन्स बिल्डिंग या प्रकल्पातील बेकायदा मजल्यांच्या बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई करून मुंबई महापालिका कायदा १८८८मधील कलम ३५४(ए) अंतर्गत स्टॉप वर्क नोटीस बजावली आहे. या टाॅवरमध्ये विनापरवानगी १७व्या मजल्याच्या वर १८वा, १९वा आणि त्यापुढील मजले आरसीसी आणि विटांच्या बांधकामातून उभारण्यास सुरुवात केल्याचे महापालिकेने नोंदवले आहे. ही कामे बांधकाम परवानगीमधील मंजूर आराखड्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लिव्हिंगस्टन टॉवरमध्ये बेकायदा पार्किंग उभारल्याबद्दल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विकसकाला नोटीस बजावून तत्काळ बांधकाम थांबविण्याचे निर्देश देऊन २४ तासांच्या आत कायदेशीर मंजुरी दाखविण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा बांधकाम पाडण्यात येईल आणि त्याचा खर्च संबंधित विकसकाकडून वसूल केला जाईल, असेही नोटिशीत म्हटले आहे. महापालिकेने या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अग्रीपाडा पोलिस ठाण्याला कळवले आहे. आवश्यक असल्यास काम करणाऱ्या मजुरांना व कंत्राटदारांना हटवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
नियमांना धाब्यावर बसवून मोठमोठ्या टॉवर्स मध्ये अवैध बांधकाम करण्यात आली आहेत. हा रहिवाशांच्या जीवाशी खेळ आहे. यावर ठोस कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयात दार मागणार आहाेत, असे तक्रारदार संताेष दाैंडकर यांनी सांगितले.
-----
तत्काळ कारवाई करणार!
ई वार्डचे सहाय्यक आयुक्त रोहित त्रिवेदी यांनी सांगितले की, ‘बेकायदा बांधकामांना अजिबात मुभा दिली जाणार नाही. मंजुरीविना सुरू केलेल्या कामांवर तत्काळ कारवाई केली जाईल. छोटी मोठी बेकायदा बांधकामे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.’
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.