मुंबई

प्रस्तावित पुलासाठी अंधेरीतील ४२ झोपडीधारकांना नोटीस

CD

प्रस्तावित पुलासाठी अंधेरीतील ४२ झोपडीधारकांना नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः अंधेरी येथे कवठे खाडीवर पूल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे ४२ झोपडीधारकांची अतिक्रमणे हटवण्याबाबत अंधेरी उपजिल्हाधिकाऱ्यांनी झोपडीधारकांना नोटिसा दिल्या आहेत. या नोटिशीमध्ये १५ दिवसांत स्वतःहून अतिक्रमणे हटवा, अन्यथा पूर्वसूचना न देता अतिक्रमणे हटवली जातील, असा इशारा देण्यात आला आहे. २६ सप्टेंबर रोजी ही नोटीस देण्यात आली होती; त्याला ११ ऑक्टोबर रोजी पंधरा दिवस पूर्ण होत असून त्यामुळे रहिवासी चिंतेत आहेत. नवीन पुलामुळे यारी रोड, पंचमार्ग वसोवा येथील परिसर हा सरदार वल्लभभाई पटेल नगर, अंधेरी पश्चिम, लोखंडवाला संकुल, समर्थनगरला जोडला जाणार आहे. या नोटिशीनुसार अतिक्रमणधारक अनधिकृत बांधकामधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत शासकीय जागेवरील अतिक्रमण व त्यावरील अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून टाकावीत, अन्यथा मुदत संपुष्टात येताच कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे निष्कासन करण्यात येतील व त्यासाठी येणारा खर्च महाराष्ट्र जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा कहर! चार महिन्यांत जवळपास हजार मिलिमीटर पाऊस! मराठवाड्यात यंदा पावसाने सर्व विक्रम मोडले

Hinjewadi Traffic: हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडीवर उपाय! पुणे बंगळूर महामार्गावरील जड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी

Manoj Jarange: जरांगे यांचा काँग्रेसनंतर राष्ट्रवादीवर घणाघात; अजित पवार यांचे नेते आरक्षणविरोधी असल्याची टीका

Karad Ward Reservation: 'कऱ्हाडमध्ये भल्याभल्यांचा पत्ता कट'; काही प्रभागांत नवखे उतरणार मैदानात; अनेकांच्या सौभाग्यवतींना संधी

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ महिलांना मिळणार नाही दिवाळीचा हप्ता; लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक, तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल बंद

SCROLL FOR NEXT