आर्याऐवजी भलत्याच संस्थेला श्रेय व मोबदला
ॲड. नितीन सातपुते यांचा दावा
मुंबई, ता. ३ : शालेय शिक्षण विभागाने रोहित आर्या यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट कंपनीऐवजी नवी मुंबईतील भलत्याच संस्थेला ‘लेट्स चेंज’ या शैक्षणिक, सामाजिक चित्रपटास श्रेय दिले. आर्या यांना अंधारात ठेवून विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेले चित्रपट शुल्क (प्रत्येकी २० रुपये) या संस्थेच्या खात्यात वळविण्यात आले. तसेच शासनाकडे प्रलंबित दोन कोटींचे बिल मिळविण्यासाठी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी २५ टक्के रकमेची मागणी आर्या यांच्याकडे केली, असा दावा ॲड. नितीन सातपुते यांनी केला.
याबाबतच्या अनेक तक्रारी राज्य शैक्षणिक परिषदेकडे करण्यात आल्या आहेत, असे ॲड. सातपुते यांनी सांगितले. दरम्यान, एप्रिल २०२३मध्ये शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शुभेच्छा संदेशात ‘लेट्स चेंज’ या चित्रपटाची निर्मिती नवी मुंबईतील संस्थेने केल्याचे नमूद आहे. ते पत्र आणि संबंधित छायाचित्रे गुरुवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. छायाचित्रांमध्ये तत्कालीन माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि आर्या एकत्र दिसत आहेत.
परिषदेकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार शासनाची माझी शाळा, सुंदर शाळा ही योजना आर्या यांच्या ‘लेट्स चेंज’ चित्रपट आणि स्वच्छता मॉनिटर या संकल्पनेवर आधारित होती. या योजनेंतर्गत हा चित्रपट शाळांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. मात्र त्यासाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी आर्या यांच्या अप्सरा कंपनीऐवजी नवी मुंबईतील संस्थेच्या नावाने अर्ज करण्यात आले. 
शासनाच्या आदेशानुसार चित्रपट प्रदर्शनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून २० रुपये शुल्क घेण्याची परवानगी होती. ही रक्कम आर्याच्या अपरोक्ष थेट नवी मुंबईतील संस्थेच्या दोन खात्यांवर वळवण्यात आली. विशेष म्हणजे प्रलंबित दोन कोटींच्या बिल मंजुरीसाठी आर्या यांच्याकडे २५ टक्के रक्कम मागितल्याच्या तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.