मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर डॉक्टरांचा संप मागे

CD

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर डॉक्टरांचा संप मागे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईसह राज्यातील सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी निवासी डॉक्टरांबरोबर बैठक घेतली. यात त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर डॉक्टरांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला. फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. त्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांनी संपदाला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला. सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड)च्या प्रतिनिधीने सांगितले, ‘‘मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वर्षा निवासस्थानी बोलावून आमच्या मागण्यांवर चर्चा केली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल. तसेच इतर मागण्यांवरही विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर आम्ही संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT