जीएचव्ही इन्फ्रा प्रोजेक्ट्सच्या
नफ्यात १३८ टक्के वाढ
मुंबई, ता. ६ : जीएचव्ही इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.ला या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १२८ टक्के जादा उत्पन्न मिळाले असून, त्यांच्या नफ्यातही १३८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
जीएचव्ही इन्फ्रा ही कंपनी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, विमानतळ, धावपट्टी, बंदरे आणि ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधाविकास तसेच स्टील, रिफायनरी, तेल आणि वायू पाइपलाइन, मोठ्या कारखान्यांचा विकास, तसेच औद्योगिक, वेअरहाउसिंग, व्यावसायिक, निवासी, हॉटेल, संस्थात्मक, रुग्णालय, प्लांट व नॉन-प्लांट इमारतींच्या ईपीसी/टर्नकी प्रकल्पांच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे.
नुकत्याच संपलेल्या तिमाहित त्यांना १८३ कोटी रुपये कामचलाऊ उत्पन्न मिळाले, तर करोत्तर नफादेखील ११ कोटींच्या वर गेला. कंपनीची एकूण मालमत्ता ५१२ कोटी रुपये असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय हंस यांनी सांगितले. कंपनीच्या ऑर्डर बुकमध्येही मोठी वाढ झाली आहे. यावर्षी ३० जून रोजी ३,४०० कोटी असलेली ऑर्डर बुक ३० सप्टेंबर रोजी वाढून ८,५०० कोटींवर पोहोचली.