मुंबई

‘मातोश्री’बाहेर ड्रोनच्या घिरट्या!

CD

‘मातोश्री’बाहेर ड्रोनच्या घिरट्या!
सुरक्षा व्यवस्थेबाबत ठाकरे गटाची चिंता; पॉड टॅक्सीसाठी सर्वेक्षण झाल्याचे स्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर एक अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत शिवसेना नेत्यांनी चिंता व्यक्त करीत सखोल चौकशीची मागणी केली. अखेर कुर्ला-बीकेसी-वांद्रेदरम्यान उभारल्या जाणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी एमएमआरडीएने पोलिसांच्या परवानगीने ड्रोन सर्वेक्षण केल्याचे स्पष्ट झाले.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी एक्स पोस्ट करीत याबाबत माहिती दिली. ‘मातोश्री’ परिसर झेड प्लस श्रेणीतील उच्चसुरक्षा क्षेत्र असल्याने या भागात कोणत्याही प्रकारे ड्रोन उड्डाण वा चित्रीकरण करण्यास मनाई आहे, तरीही एक ड्रोन परिसरात घिरट्या घालत असल्याचे दिसल्यानंतर सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. नेमक्या कोणत्या उद्देशासाठी ड्रोन उडवण्यात आला, याबाबत पोलिस प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला. ‘मातोश्री’च्या सुरक्षेत कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने कुर्ला-बीकेसी-वांद्रे परिसरात उभारल्या जाणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी बीकेसी आणि खेरवाडी परिसरात ड्रोन सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण परिमंडळ आठचे उपायुक्त मनिष कालवानिया यांनी दिले.
-----
कोणत्या सर्वेक्षणांतर्गत घरांमध्ये डोकावण्याची आणि पकडल्यावर ताबडतोब पळून जाण्याची परवानगी दिली जाते? याबाबत पूर्वसूचना का दिली नाही. बीकेसीच्या सर्वेक्षणासाठी एमएमआरडीए केवळ ‘मातोश्री’चे सर्वेक्षण का करत आहे?
- अरविंद सावंत, खासदार
-----
चित्रीकरणाचा वापर प्रकल्पासाठीच!
कुर्ला-बीकेसी-वांद्रेदरम्यान एमएमआरडीएकडून खासगी-सार्वजनिक भागीदारीत पॉड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी पोलिसांच्या परवानगीने ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. पोलिस आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण करण्यात आले. ड्रोनद्वारे केलेले चित्रीकरण केवळ प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे, असे स्पष्टीकरण एमएमआरडीएने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना दणका! राज्यभरात फळबागांचे मोठे नुकसान; तासभर गारांचा मारा..

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

SCROLL FOR NEXT