मुंबई

शिवडी-देवनारमधील हवेचा दर्जा घसरला

CD

शिवडी-देवनारमधील हवेचा दर्जा घसरला


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मुंबईच्या हवेत पुन्हा प्रदूषणाचे विष मिसळले असून, शिवडी आणि देवनार परिसर हवा प्रदूषणाच्या केंद्रस्थानी पोहोचले आहेत. ‘समीर’ ॲपवर रविवारी (ता. ९) नोंदवण्यात आलेल्या हवा दर्जा निर्देशांकानुसार (एक्यूआय) शिवडीचा निर्देशांक तब्बल २५०, तर देवनारचा १७८ इतका नोंदविला गेला आहे.

शिवडी परिसरातील हवा ‘अतिशय खराब’ या श्रेणीत वर्गीकृत झाली असून, तिथे दीर्घकाळ बाहेर राहणाऱ्या नागरिकांना श्वासोच्छ्‍वासाचा त्रास, डोळे जळजळ, तसेच थकवा जाणवू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तर देवनार क्षेत्रातील हवा ‘मध्यम ते खराब’ या पातळीवर असून, अस्थमा, फुप्फुसाचे किंवा हृदयविकाराच्या रुग्णांनी बाहेर पडताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. याउलट, कुलाबा परिसरातील एक्यूआय फक्त ४५ इतका नोंदवला गेला आहे, जो मुंबईतील सर्वात स्वच्छ हवा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मुंबईतील हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढलेले असून, वाहनांतून होणारे प्रदूषण, औद्योगिक उत्सर्जन आणि बांधकाम स्थळांवरील दुर्लक्ष हे प्रदूषण वाढवणारे प्रमुख घटक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.

ठिकाण - (एक्यूआय)
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स - १६१
बोरिवली (पूर्व) - ११२
भायखळा - ७७
चाकाला (अंधेरी पूर्व) - ११९
चेंबूर - ९८
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ - ११९
कुलाबा - ४५
देवनार - १७८
घाटकोपर - १५५
कांदिवली (पश्चिम) - ७०
खेरवाडी (बांद्रा पूर्व) - १३०
खिंडीपाडा भांडुप पश्चिम) - ८५
कुर्ला - ९९
मालाड (पश्चिम) - १६१
माझगाव - १२१
मालाड पश्चिम - ९७
मुलुंड (पश्चिम) - ७१
नेव्हीनगर (कुलाबा) - १४७
पवई - ८३
शिवडी - २५०
शिवाजीनगर - १२६
सिद्धार्थनगर (वरळी) - ९९
सायन - ६६
वसई (पश्चिम) - १२३
विलेपार्ले (पश्चिम) - ८४
वरळी - ९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना दणका! राज्यभरात फळबागांचे मोठे नुकसान; तासभर गारांचा मारा..

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

SCROLL FOR NEXT