मुंबई

धारावीतील पर्यटनाला नव्या क्षितिजाची आस

CD

धारावीतील पर्यटनाला नव्या क्षितिजाची आस
पुनर्विकासानंतरही व्यवसाय वाढण्याची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या धारावीला दरवर्षी सुमारे ८० हजार ते एक लाख पर्यटक भेट देतात. त्यात बहुतांशी परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीचा, अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला पुनर्विकास आता दृष्टिपथात आला आहे. पुनर्विकासामुळे स्थानिक पर्यटनाच्या क्षेत्रातही नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा येथील पर्यटन व्यावसायिकांना आहे.
धारावीत गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या ‘स्लम टुरिझम’ची वार्षिक उलाढाल सुमारे १५ कोटींपर्यंत आहे. सुमारे २० ते २५ लहान-मोठे टूर ऑपरेटर्स पर्यटकांना धारावीची सफर घडवतात. धारावीतील लघुउद्योग, छोट्या गाळ्यांमधील कारखाने, गजबजलेली बाजारपेठ, दाटीवाटीच्या वस्त्या, अपवादात्मक इमारती, शाळा, बेकरी आणि सर्वसामान्यांचे जीवन दाखवले जाते.
धारावी मेन रोड परिसरात राहणाऱ्या तौसिफ सिद्दिकीने ‘बी द लोकल’ नावाची कंपनी सुरू केली. ‘स्लम टुरिझम’ म्हणजे आम्ही येथील गरिबी पर्यटकांना दाखवतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. वास्तविक आम्ही पर्यटकांना धारावीची ‘खरी ओळख’ करून देतो. समस्यांविषयी कोणतीही तक्रार न करता मेहनत करणाऱ्या स्थानिकांच्या जीवनातून अनेक पर्यटकांना प्रेरणा मिळते, असे तौसीफ सिद्दिकीने सांगितले.
----
विस्तृत डॉक्युमेंटेशन व्हावे!
धारावीचा पुनर्विकास व्हायलाच हवा; मात्र धारावीचा आत्मा या पुनर्विकासात जपायला हवा. त्यासोबतच आताच्या धारावीचे विस्तृत डॉक्युमेंटेशन व्हायला हवे. जेणेकरून आधीची धारावी आणि पुनर्विकासानंतरची नेत्रदीपक धारावीतील भौगोलिक आणि सामाजिक बदल अधोरेखित करता येईल, अशी अपेक्षा तौसीफ सिद्दिकीने व्यक्त केली.
----
पुनर्विकासात उद्योगही हवे!
मोहम्मद सादिक ‘इनसाइड मुंबई टूर’ कंपनी चालवतो. मोहम्मदच्या मते बाहेरून धारावी भलेही दाटीवाटीची, अस्वच्छ किंवा गचाळ दिसत असेल, पण आतून ती खूपच ‘खूबसूरत’ आहे. धारावीचे सौंदर्य येथील लोकांच्या मेहनतीत, छोट्या-मोठ्या उद्योगांत आहे. पुनर्विकास तर हवाच आहे, पण या उद्योगांना पुनर्विकासात सामावून घेतल्यास भविष्यातही पर्यटक येथे येतील, असे मोहम्मद यांनी सांगितले.
----
वाढते पर्यटन
दरवर्षी, पावसाळ्यानंतर जगभरातील पर्यटकांची पावले धारावीच्या दिशेने वळू लागतात. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून धारावीत परदेशी पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे. ब्रिटिश पर्यटक ख्रिस वे आणि दक्षिण भारतीय कृष्णा पुजारी यांनी आफ्रिकेतील फेवेला टूरच्या धर्तीवर धारावीत एज्युकेशनल स्लम टूर सुरू केली. ही केवळ मुंबईतील नव्हे तर देशभरातील पहिली स्लम टूर ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रूग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; घटनास्थळाचीही पाहणी केली

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT