मुंबई

जे.जे. मार्ग परिसरात हुंडाबळी

CD

जे. जे. मार्ग परिसरात हुंडाबळी

पतीविरुद्ध गुन्हा; विवाहितेची व्हिडिओ बनवून आत्महत्या

मुंबई, ता. १० : हुंड्यासाठी पतीकडून सुरू असलेल्या अमानुष छळाला कंटाळून २६ वर्षीय विवाहितेने शनिवारी (ता. १०) जे. जे. मार्ग परिसरातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेने आत्महत्येपूर्वी अत्याचारांबाबत तपशीलवार माहिती देणारा व्हिडिओ तयार करून तो पालकांना पाठवला होता. या व्हिडिओसह व्हॉट्सॲप व्हॉइस रेकॉर्डिंग पुरावा म्हणून नोंदवून जे. जे. मार्ग पोलिसांनी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

मेहेक (२६) असे मृत विवाहितेचे नाव असून, २०१९मध्ये इम्रान नावाच्या तरुणासोबत तिचा विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर दोनच आठवड्यांत पती आणि नणंदेने तिचा छळ सुरू केला. गरोदर असतानाही हा छळ सुरूच हाेता. मुलीला जन्म देताच तिला मारू, विकू अशा धमक्या देण्यात आल्या. चारचौघात पतीने गळा आवळून मेहेकला ठार मारण्याचा प्रयत्नही केला हाेता. हा छळ असह्य झाल्याने तिने व्हॉइस रेकॉर्डद्वारे इम्रानच्या नातेवाइकांना आणि आपल्या पालकांना माहिती देऊन माहेर गाठले. त्यानंतर दाेन्हीकडील घरच्यांनी बैठक घेऊन इम्रानला समज दिली; मात्र त्यानंतर छळ आणखीन वाढला.

७ नोव्हेंबरला मेहेक नोकरीवरून थेट तळोजा येथील माहेरी गेली. ८ नोव्हेंबरला ती आपल्या घरी परतली. रात्री १०च्या सुमारास तिचे तिच्या आईसोबत बोलणे झाले. अर्ध्या तासानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या अर्ध्या तासात इम्रानने तिच्याशी भांडण केले असावे, असा अंदाज पालकांनी जबाबाबत व्यक्त केला.

पालकांची मनधरणी कामी आली नाही
आत्महत्येपूर्वी पाठवलेला व्हिडिओ पाहून आग्रा येथे मूळ गावी गेलेल्या पालकांनी मेहेकची बरीच मनधरणी केली. आयुष्य संपवणे हा उपाय नाही, असे सांगून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पालकांचा तो प्रयत्न अपयशी ठरला. पतीकडून सुरू असलेला अत्याचार कधीच संपणारा नाही, असे सांगून मेहेकने गळफास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Kuno Cheetah: भारतात चित्त्यांचे 'अर्धशतक' पूर्ण! ज्वालाने दिला ५ पिल्लांना जन्म; कूनोमध्ये आता चित्त्यांची संख्या ५३ वर!

Maharashtra U23 Women Cricket: महिला २३ वर्षाखालील क्रिकेट; महाराष्ट्राने तमिळनाडूवर ८ विकेटने मात

SCROLL FOR NEXT