मुंबई

न्यायालयीन कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती ऑनलाइन

CD

न्यायालयीन कागदपत्रांच्या
प्रमाणित प्रती ऑनलाइन

मुंबई हायकोर्टात लवकरच ऑनलाइन पोर्टल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः न्यायालयात दाखल झालेली कागदपत्रे आणि त्याच्या प्रमाणित प्रती मिळण्यासाठी तिथे जाऊन वकिलांना आणि पक्षकारांना अर्ज करावा लागतो. लवकरच ही प्रक्रिया ऑनलाइन हाेणार असून त्यासाठी पोर्टलद्वारे सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वकील आणि पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ॲड. मदन कुऱ्हे यांनी उच्च न्यायालयाच्या ई-समितीकडे पत्रव्यवहार करून यासंदर्भात पाठपुरावा केला हाेता. त्यावर उच्च न्यायालयाचे ई-कोर्ट प्रकल्पाच्या समन्वयकांनी ई-मेलद्वारे सांगितले, की प्रमाणित प्रतींसाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे सुविधा सुरू करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सुरुवातीला उच्च न्यायालय आणि नंतर राज्यातील सर्व जिल्हा न्यायालय आणि तालुका पातळीवरील न्यायालयात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात ‘लीगल एड डिफेन्स काउन्सेल’ (न्यायरक्षक) म्हणून काम करताना ॲड. मदन कुऱ्हे यांनी समस्येकडे लक्ष वेधले. राज्य सरकारने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत वंचित, पीडित, गरीब लोकांसाठी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली ही सेवा आहे. प्रत्यक्षात या व्यवस्थेत काम करताना प्रमाणित प्रती मिळण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे जलद न्याय मिळण्याच्या मूलभूत अधिकाराचे हनन होते. त्यामुळे कुऱ्हे यांनी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या ई-समितीकडे यासंबंधी पत्र लिहिले होते.
-----
ऑनलाइन पोर्टल सुविधेमुळे ‘ॲक्सेस टू जस्टिस’ हा भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे प्रमाणित प्रती मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद होईल. ही व्यवस्था जिल्हा आणि तालुका न्यायालय स्तरावरही पोहोचवण्याची गरज आहे.
- मदन कुऱ्हे, वकील, उच्च न्यायालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT