मुंबई

आभासी चलनाआडून ९० लाखांची फसवणूक

CD

आभासी चलनाआडून
९० लाखांची फसवणूक

मुंबई, ता. १० : आभासी चलन उपलब्ध करून देतो, असे सांगून गारमेंट व्यावसायिकास तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीविरोधात एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदवला.

राजेश बंभानिया असे तक्रारदाराचे नाव असून, त्यांचा असल्फा परिसरात गारमेंट कारखाना आहे. ते चीन येथून कच्चा माल विकत घेतात. हा व्यवहार आभासी चलनाद्वारे सुलभ आणि किफायतशीर पडेल, असा सल्ला त्यांना त्यांच्या भावाने दिला. त्यासाठी आभासी चलन उपलब्ध करून देणाऱ्यांच्या शोधात ते होते.
परिचित व्यावसायिक ध्रुव मेहता याने त्यांना ९० लाख रुपयांचे आभासी चलन मिळवून देतो, असे सांगितले. तसेच ८ डिसेंबरला रोख रक्कम घेऊन मरोळ येथील आपल्या कार्यालयात बोलावले. तेथे आधीपासून सात ते आठ जण हजर होते. या सर्वांनी राजेश यांनी आणलेली रोकड मोजली. पुढल्या काही क्षणात आपल्या खात्यावर आभासी चलन उपलब्ध होईल, असे सांगून ते ही रोकड घेऊन निघून गेले. त्यानंतर बराच वेळ वाट पाहूनही चलन न मिळाल्याने राजेश यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT